स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजही माफीवीर म्हणून का उभं केलं जातंय

स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजही माफीवीर म्हणून का  उभं केलं जातंय

सावरकर यांनी माफी मागितली होती की नव्हती यावर यापूर्वीही अनेकदा वाद झाला आहे. या वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? सावरकरांचं माफी प्रकरण आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं हे आपण जाणून घेऊ.अंदमानच्या सेल्युलर जेलमधले दिवस पकडले गेल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवलं गेलं आणि पुढची 25 वर्षें ते इंग्रजांचे कैदी बनून राहिले. त्यांना 25-25 वर्षांच्या कारवासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या आणि शिक्षा भोगण्यासाठी भारतातील अंदमान इथं पाठविण्यात आलं. या शिक्षेला ‘काळ्या पाण्या’ची शिक्षाही म्हणायचे. Why Swatantryaveer Savarkar is still being raised as an Mafiveer apology hero

त्यांना 698 खोल्यांमधील सेल्युलर जेलमध्ये 13.5 बाय 7.5 आकाराच्या खोली क्रमांक 52 मध्ये ठेवण्यात आलं होतं. अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बग्गीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्ग्या ओढाव्या लागायच्या. “तिथले रस्तेही धड नव्हते आणि बराचसा भाग हा डोंगराळ होता. जेव्हा कैदी बग्गी ओढू शकायचे नाहीत, तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पाणचट सूप दिलं जायचं.” अनेकदा कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं रहायची शिक्षाही दिली जायची.

सावारकरनी इंग्रजांकडे दिलेल्या माफीनामा बाबत निरंजन टकले यांची माहिती

या सेल्युलर जेलमध्येच सावरकरांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरूंगात त्यांनी घालविलेल्या 9 वर्षें आणि 10 महिन्यांनी त्यांचा इंग्रजांना असलेला विरोध पूर्णपणे मावळला. निरंजन टकले सांगतात, “मी सावरकरांच्या आयुष्याकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता.”

“अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. 11 जुलै 1911 ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि 29 ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर 9 वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. “जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती,” असं निरंजन टकले सांगतात.

“अजून एक कैदी बरिंद्र घोष यांनी सांगितलं, की सावरकर बंधू आम्हाला जेलरविरोधात आंदोलन करण्यासाठी गुपचूप प्रोत्साहन द्यायचे. जेव्हा आम्ही त्यांना तुम्हीही आमच्यासोबत या असं म्हणायचो तेव्हा ते मागं हटायचे. तुरूंगात त्यांना कोणतंही अवघड काम दिलं गेलं नव्हतं.”इंग्रजांकडे माफीनामा देताना सावरकरांनी आपल्याला भारतातील अन्य कोणत्याही तुरूंगात पाठविण्याची विनंती केली होती. त्याबदल्यात कोणत्याही तऱ्हेनं सरकारची मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती,” असं टकले म्हणतात.

इंग्रजांनी जी काही पावलं उचलली आहेत, त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेवरचा आपला विश्वास दृढ झाला असून आपण आता हिंसेचा मार्ग सोडल्याचं सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं होतं. या माफीनाम्याचा परिणाम म्हणून कदाचित सावरकरांना 30 आणि 31 मे 1919 ला आपली पत्नी आणि धाकट्या भावाला भेटण्याची परवानगी मिळाली होती. Why Swatantryaveer Savarkar is still being raised as an Mafiveer apology hero

जेलमधून बाहेर राहण्यासाठीची रणनीती

नंतरच्या काळात सावरकरांनी इंग्रजांकडे माफी मागण्याच्या आपल्या कृतीचं समर्थनही केलं होतं. हा आपल्या रणनीतीचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं. सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं, की जर मी तुरूंगात असहकार पुकारला असता तर माझा भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असता. भगत सिंह यांच्याकडेही माफी मागण्याचा पर्याय होता. मात्र त्यांनी असं केलं नाही. मग सावरकरांची अशी कोणती हतबलता होती, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर आर्ट्सचे प्रमुख राम बहादुर राय यांना विचारला.

राम बहादुर राय यांनी सांगितलं, की भगत सिंह आणि सावरकरांमध्ये खूप मौलिक अंतर आहे. भगत सिंह यांनी ज्यादिवशी बॉम्ब फेकण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी निश्चित केलं होतं की आपण फासावर जायचं आहे. दुसरीकडे सावरकर मात्र चतुर क्रांतिकारी होते.”भूमिगत राहून जितकं काम करता येईल, तितकं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आपल्या माफी मागण्यावर लोक काय म्हणतील याचा सावरकरांनी विचार नाही केला. आपण तुरूंगाच्या बाहेर राहिलो, तरच आपल्याला हवं ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं.”

इंग्रजांसोबत करार

1924 साली सावरकरांची पुण्यातील येरवडा जेलमधून दोन अटींवर सुटका करण्यात आली. एक म्हणजे ते कोणत्याही राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाहीत आणि दुसरी म्हणजे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते जिल्ह्याबाहेर पडणार नाहीत. निरंजन टकले सांगतात, की सावरकरांनी व्हाईसरॉय लिनलिथगो सोबत लिखित करार केला होता. गांधी, काँग्रेस आणि मुसलमानांना विरोध करणं हे आपल्या दोघांचंही समान उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

“इंग्रज सरकार त्यांना महिना साठ रुपये पेन्शनही देत होतं. सावरकर त्यांची अशी कोणती सेवा करत होते, की त्यांना पेन्शन दिलं जावं? असं पेन्शन मिळणारे स्वातंत्र्यलढ्यातील ते एकमेव व्यक्ती होते.” Why Swatantryaveer Savarkar is still being raised as an Mafiveer apology hero

Why Swatantryaveer Savarkar is still being raised as an Mafiveer apology hero

हे ही वाचा —–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका