जीवन परिचय Eknath Shinde Biography श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती – Eknath Shinde Information in Marathi
एकनाथ शिंदे Eknath Shinde Biography यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. Who is Eknath Shinde, the 20th Chief Minister of Maharashtra State? एकनाथ संभाजी शिंदे माहिती – Eknath Shinde Biography in Marathi
शैक्षणिक पात्रता
गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
राजकीय प्रवास Eknath Shinde political Biography (About Eknath Shinde)
एकनाथ संभाजी शिंदे Eknath Shinde political Biography हे शिवसेना नेते असून महाराष्ट्र राज्याचे २०वे मुख्यमंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे. असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री. या आधी 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2019 च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. Who is Eknath Shinde, the 20th Chief Minister of Maharashtra State?
डोळ्यादेखत पाण्यात बुडाले होते मुलं तेव्हा सोडले होते राजकारण. एकनाथ संभाजी शिंदे माहिती – Eknath Shinde Biography in Marathi
2 जून 2000 रोजी एकनाथ शिंदे त्यांचा 11 वर्षांचा मुलगा दिपेश आणि 7 वर्षांची मुलगी शुभदा यांना घेऊन सातारा येथे गेले होते. बोटिंग करत असताना अपघात झाला आणि शिंदे यांची दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली. त्यावेळी शिंदे यांचे तिसरे अपत्य श्रीकांत अवघे 14 वर्षांचे होते. एका मुलाखतीत या वेदनादायक घटनेची आठवण करून देताना शिंदे म्हणाले होते, ‘तो माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णपणे तुटले होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला, राजकारणही. या घटनेला 22 वर्षे झाली आहेत.
शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील रहिवासी आहेत, परंतु त्यांची कार्यभूमी ठाणेच राहिली. शिंदे सुरुवातीला ठाण्यात ऑटो चालवायचे. शिवसेनेचे खंबीर नेते आनंद दिघे यांहून प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रथम शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि नंतर ठाणे महापालिकेचे नगरसेवक निवडून आले. मुलाच्या निधनानंतर शिंदे यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिघे यांनीच त्यांना परत आणले.
आनंद दिघे यांच्या आकस्मिक निधनानंतर शिंदे यांना राजकीय वारसा मिळाला
26 ऑगस्ट 2001 रोजी अचानक दिघे यांचे अपघाती निधन झाले. त्याच्या मृत्यूला आजही अनेकजण हत्या मानतात. नुकताच दिघे यांच्या मृत्यूवर मराठीत धरमवीर नावाचा चित्रपटही आला आहे. डिगे यांना धरमवीर म्हणूनही ओळखले जात होते. दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेला ठाण्यातील वर्चस्व राखण्यासाठी एका चेहऱ्याची गरज होती. ठाकरे कुटुंबाला निवांत वृत्तीने ठाणे सोडता आले नाही. त्याचं कारण म्हणजे ठाणे हा महाराष्ट्रातील मोठा जिल्हा आहे. शिंदे यांचा सुरुवातीपासूनच दिघे यांच्याशी संबंध असल्याने त्यांचा राजकीय वारसा शिंदे यांना मिळाला.
शिंदे सलग चार वेळा विजयी होऊन विधानसभेत पोहोचले
शिंदे हेही त्यांच्या गुरूप्रमाणे लोकनेते होते. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. लवकरच त्यांनी ठाण्यात असा दबदबा निर्माण केला की ते तिथल्या राजकारणाचे केंद्र बनले. 2009, 20014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या विजय झाला. 2014 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले.
मंत्रीपदावर असताना शिंदे यांच्याकडे नेहमीच महत्त्वाची खाती होती. 2014 मध्ये ते फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यानंतर 2019 मध्ये शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहसा हा विभाग त्यांच्याकडे ठेवतात. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार वांद्रे-वर्सोवा सी लिंक ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग शीळ-कल्याण रुंदीकरण ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता