UPSC 2021 चा निकाल जाहीर; पहिल्या चार टॉपर्स मुली, महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

UPSC 2021 चा निकाल जाहीर; पहिल्या चार टॉपर्स मुली, महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

Union Public Service Commission 2021 results announced; The first Four toppers girls, these candidates from Maharashtra won

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससी-२०२१ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिल्या चार टॉपर्स मुली आहेत. यामध्ये श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला तर चौथ्या क्रमांकवर ऐश्वर्या वर्मा आहेत. (Shruti Sharma Holds First Rank in UPSC 2021)

अंतिम निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. यंदा एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (UPSC 2021 Results How to Check) Union Public Service Commission 2021 results announced; The first three toppers girls, these candidates from Maharashtra won

श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (JNU) माजी विद्यार्थिनी आहे. ती जामिया इस्लामिया कोचिंग अकादमीमध्ये UPSC परीक्षेची तयारी करत होती. Union Public Service Commission 2021 results announced; The first three toppers girls, these candidates from Maharashtra won

UPSC CSE प्रीलिम्स 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबरला जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. यानंतर 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या मुलाखतींनंतर आज निकाल जाहीर झाला आहे.

यावर्षी परीक्षा ५ जूनला पार पडणार

या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा 5 जून रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी UPSC ने उमेदवारांना OMR शीट कशी भरायची ते सांगितलंय. यूपीएससीनं OMR शीटच्या प्रतिमा (फोटो) शेअर करून उमेदवारांना अर्ज भरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी आणि संपूर्ण तपशील तपासावा, असंही आवाहन त्यांनी केलंय.

 यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससीच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत पहिल्या चार मुलींचा समावेश आहे. (UPSC Civil Service final result 2021 declared check topper list maharashtra 40 student)

महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)

2) ओंकार पवार (१९४)

3) शुभम भोसले (१४९)

4) अक्षय वाखारे (२०३)

5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)

6) पूजा खेडकर (६७९)

7) अमोल आवटे (६७८)

8) आदित्य काकडे (१२९)

9) विनय कुमार गाडगे (१५१)

10) अर्जित महाजन (२०४)

11) तन्मय काळे (२३०)

12) अभिजित पाटील (२२६)

13) प्रतिक मंत्री (२५२)

14) वैभव काजळे (३२५)

15) अभिजित पठारे (३३३)

१६) ओमकार शिंदे (४३३)

१७) सागर काळे (२८०)

१८) देवराज पाटील (४६२)

१९) नीरज पाटील (५६०)

२०) आशिष पाटील (५६३)

२१) निखील पाटील (१३९)

२२) स्वप्नील पवार (४१८)

२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)

२४) राहुल देशमुख (३४९)

२५) रोशन देशमुख (४५१)

२६) रोहन कदम (२९५)

२७ ) अक्षय महाडिक (२१२)

२८) शिल्पा खनीकर (५१२)

२९)रामेश्वर सब्बनवाड (२०२)

३०)शुभम नगराले (५६८)

३१)शुभम भैसारे (९७)

राज्यातील उमेदवारांची यादी अपडेट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका