शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रच्या वतीने आवाहन.
नांदेड. ः शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामात पिकाची पेरणी किंवा लागवड करताना आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच पिकाची पेरणी माती परीक्षण केंद्राच्या शिफारशीनुसार पिकास आवश्यक खताच्या मात्रा देऊनच करावी व आपल्या पिकाचे भरघोस उत्पन्न वाढावावे.
अनावश्यक खताचा खर्च टाळावा याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे मातीचे परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकाची पेरणी,लागवड करावी असे आवाहन लिंगापूर ता.हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी केले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण केले त्यांना चांगला फायदा झाला आहे.