शासन निर्णय- शिवस्वराज्यभिषेक दिन हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

शासन निर्णय- शिवस्वराज्यभिषेक दिन हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’

मुंबई : राज्यात सोमवार दि. 6 जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. (Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’)

तरी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक, पंचायत समितीचे सभापती/ गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाचे पालन करावे ही विनंती. शासन आदेशात नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांंचा उल्लेख केला नाही तरी नगरविकास विभागाने वरील नागरी संस्थांना ही निर्देशीत करावे ही विनंती.

अशा या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला  आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. या स्वराज्यात ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावायचा नाही’ हा हुकूम तंतोतंत पालन होत, परस्त्री मातेसमान मानले जात, सर्व धर्मांच्या ग्रंथ आणि प्रार्थना स्थळे सुरक्षित होती. माणसांना माणूस म्हणून जगण्याच पुर्ण स्वातंत्र्य होत अशा लोककल्याणकारी राजांनी राज्याभिषेक करुन घेऊन जगमान्य होण्यासाठी रयत शिवरायांपाशी आग्रही होती.


या सुवर्ण सोहळ्याची नोंद जगभरात झाली होती.
रयतेच्या राज्याच गौरवार्थ स्मरण होण्यासाठी यंदाच्या वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा “शिवराज्याभिषेक दिन” हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करावयाचा आहे. या निमित्ताने भगवा ध्वज Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’

हे ही वाचा —–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका