vinayak mete diedशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन

vinayak mete diedशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन

सकाळी सकाळी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे.  माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या समर्थक चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील माडप बोगद्यामध्ये हा अपघात झाला. विनायक मेटे  त्यांच्या एसयूव्ही कारमधून जात होते.

यादरम्यान त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. त्यांना नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

प्राथमिक माहितीनुसार अपघातानंतर त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची कारणे समजू शकली नाहीत. मात्र, या अपघातात विनायक मेटे यांच्या एसयूव्ही कारचा चक्काचूर झाला. गाडीची स्थिती पाहूनच आपल्याला अपघाताचा अंदाज लावता येतो.विनायक मेटे मराठा समाजाचे लोकप्रीय नेते होते. मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारकाच्या समितीचे ते अध्यक्ष होते. शिवस्मारक होण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली होती. देवेंद्र फडणवीसांचे ते कट्टर समर्थक होते.

मराठा आरक्षणासाठीच्या अनेक आंदोलनांत त्यांचा सक्रीय सहभाग होता. अनेक धाडसी आंदोलने करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. कुमार केतकरांच्या घरावरील हल्ल्याचे त्यांचे आंदोलन खूपच गाजले होते. अशा रणझुंजार नेत्याला भावपुर्ण श्रद्धांजली.

महत्वाच्या बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका