And Rajarshi Shahu Maharaj reprimanded that Mujor racist judge….
शाहू महाराजांनी एका दलित तरूणांस न्यायालयात कारकुनाची नोकरी दिली.तो आनंदाने नोकरीवर रूजू झाला. परंतु तिथे प्रत्येकजण त्याच्याकडे हिणकस नजर ठेवून पाहू लागला, कोण त्याच्या शेजारी बसावयास तयार नाही. अथवा बोलावयासही तयार नाही.प्रत्येक जण वाळीत टाकल्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करू लागला. एवढेच नव्हे तर त्याला कोणतेही काम सांगितले अथवा दिले पण जात नव्हते. त्याने स्पर्श केलेल्या कागदाची शिवाशिव होईल, या भीतीने त्याला शिपायाचेही काम कोणी सांगेना. Social reformer Raje Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
तो दलित तरूण अक्षरश: वैतागून गेला. सकाळी येऊन टेबल समोर घेऊन खुर्चीत बसावयाचे व येणाऱ्या जाणाऱ्यांची तोंडे पाहत संध्याकाळपर्यंत तसेच बसून राहावयाचे; त्यामुळे वैतागून तो मनातल्या मनात विचार करू लागला, “आमच्या देवरूपी महाराजांनी मला नोकरी दिली, त्या वेळी आमच्या अख्ख्या वस्तीला, एक अख्खी गुळाची ढेप वाटली होती.केवढा मोठा आनंद झाला होता! आता ही नोकरी नसलेली बरी वाटते.अशीच नोकरी करावी लागली तर पंचगंगेत किंवा रंकाळ्यात मला आत्महत्याच करावी लागेल.” Social reformer Raje Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
महिना उलटला. पहिला पगार झाला. न्यायमूर्तीनी त्या दलित तरूणांस एक नोटिस दिली, त्या नोटिसीत म्हटले, “तुमचे काम समाधानकारक नाही, कामात सुधारणा न झाल्यास दंड केला जाईल.” त्याला धक्काच बसला. असाच दुसराही महिना पार पडला.पगाराच्या दिवशी त्याला पगार देण्यात आला; परंतु दंडाची रक्कम कापून घेऊन राहिलेले पैसे त्याच्या हातावर ठेवण्यात आले व त्या न्यायमूर्तीनी त्या कारकुनासंबंधी त्याला काम येत नाही, म्हणून दंड आकारल्याचे पत्र शाहू महाराजांना पाठविले.
त्यावेळी महाराजांनी त्वरित त्या न्यायमूर्तीला तोल न जाऊ देता संयमी पत्र लिहिले, “दंड हा सुधारण्याचा मार्ग नाही. म्हणून त्याचा दंड त्वरित परत करावा व त्याला सुधारण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. आपण स्वतः जातीने त्याला कामाची माहिती करून द्यावी.” पत्र हाती पडताच न्यायमूर्तीचा राग अनावर झाला. परंतु महाराजांपुढे त्याचे काय चालणार? पुन्हा असाच काम न करता त्या कारकुनाचा तिसराही महिना गेला, पगाराच्या दिवशी न्यायमूर्तीनी त्याच्या हातावर एक नोटिस ठेवली, “आपले काम असमाधानकारक असल्यामुळे आपला पगार तहकूब ठेवण्यात आलेला आहे.”
त्यांनी एक पत्र महाराजांना पाठविले, “या कुचकामी कारकुनाला नोकरीतुन मुक्त करावे.” न्यायमूर्तीच्या कृतीचा महाराजांना राग आला, परंतु या रागावर संयम ठेवीत महाराजांनी पत्र लिहिले, “त्या कारकुनास आपण स्वतः प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे. यात जर तुम्हास अपयश आले तर तुम्ही अकार्यक्षम आहात असे समजून तुमच्याबाबत गंभीर विचार करण्यात येईल.” And Rajarshi Shahu Maharaj reprimanded that Mujor racist judge ….
जादूच्या कांडीप्रमाणे महाराजांच्या पत्रामुळे ऑफिसचे सारेच चित्र पालटले व चौथ्या महिन्यापासून त्या कारकुनाच्या हातावर बिननोटिसाचा पूर्ण पगार नियमित पडू लागला. Rajarshi Shahu Maharaj reprimanded that Mujor racist judge …. Social reformer Raje Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
संदर्भ: शाहूंच्या आठवणी.
हे ही वाचा ——-
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला