मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. आज संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेतली आहे. हे आंदोलन मागे घेणार नाही पण सरकारशी चर्चा सुरुच राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.
Maratha Reservation 6 main demands from Sambhaji Raje and Sakal Maratha Samaj to CM Uddhav Thackeray and other Ministers
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्यासमोर सहा प्रमुख मागण्या पुढे ठेवल्या होत्या. त्यासाठी काल आम्ही कोल्हापूरात मूक आंदोलन केलं होतं ज्याची सरकारने ताबडतोब दखल घेतली आणि आज बैठक घेतली. बैठकीत सारथीच्या मुद्यावर दीड तास चर्चा झाली. सरकारने सकारात्मक संवाद केला.
बैठकीत घेतलेले निर्णय
- मूक आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल
- येत्या गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडून तत्त्वत: मान्यता
- वसतीगृहाच्या मुद्यांबाबत 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमधल्या वसतीगृहांसाठी सरकारकडून पैसे देण्यास मान्यता
- शनिवारी सारथीबाबत अजित पवार बैठक घेणार
- अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यातल्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन
- सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वयक समिती स्थापन करणार
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Informationदरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजारा केला जातो 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत, त्याच वर्षी 18 जुलैच्या भारतीय…
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathiशाहू महाराज, ज्यांना राजर्षी शाहू म्हणूनही ओळखले जाते, ते एक मराठा शासक होते ज्यांनी 19 व्या शतकाच्या आणि 20 व्या…
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?शिवरायांचा राज्याभिषेक हि घटना इतिहासातील सर्वांत महत्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते, या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि याचे परिणाम सुद्धा…
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढूतुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची हत्या…
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झालाTomb of Maharani Yesubai discovered; An old land donation letter led to the revelation छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी…