समस्या – गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची प्रेरणादायी कथा

समस्या – गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाची प्रेरणादायी कथा

Gautam Buddha Story In Marathi एक शेतकरी खूपच उदास त्याच्या घराजवळ बसला होता. तेव्हा त्याच्या जवळ एक व्यक्ती आला तो शेतकरी त्या व्यक्तीला आपली व्यथा सांगू लागला. त्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला. गौतम बुद्ध त्यावेळेस शेजारच्याच एका गावामध्ये आले होते. तो शेतकरी या व्यक्तीचे हे वाक्य ऐकत भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांकडे गेल्यानंतर तो त्यांना आपली व्यथा सांगु लागला. “भगवान बुद्ध मला मी एक शेतकरी आहे मला शेती करणे आवडते. परंतु ज्या वेळेस मी काही माझ्या शेतामध्ये पेरतो त्यावेळेस मला त्यातून काहीच मिळत नाही. एकेकाळी पाऊस जास्त होतो आणि दुसऱ्या वेळेस पाऊस काहीच होत नाही त्यामुळे माझे फारच नुकसान झाले आहे मला आता काहीच समजत नाहीये मी काय करू आणि काय नाही. मला दोन वेळचे जेवण देखील मिळणे कठीण होत आहे.” (समस्या – Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi) Gautama Buddha’s philosophy inspiration Story

गौतम बुद्ध त्या शेतकऱ्याचे बोलणे शांती पूर्वक ऐकत होते. तो शेतकरी पुन्हा बोलू लागला गौतम बुद्ध मी एक विवाहित आहे. मला माझी पत्नी आवडते पण कधी कधी ती मला टोचून बोलत असते आणि त्रास देत असते. त्यामुळे आमच्या मध्ये खूप वाद होत असतात. कधीकधी मला तर असे वाटते की मला माझ्या पत्नीचा त्रास होत आहे आणि कधी कधी असे वाटते की ती माझ्या आयुष्यात नसती तर फार बरे झाले असते. मला मुले देखील आहेत. मी त्याचे खूप लाड करतो परंतु ते कधीकधी माझ्याशी तुच्छतेने वागतात. कधी-कधी ते माझे ऐकताच नाहीत तेव्हा असे वाटते की ही नक्की माझीच मुली आहेत का? (समस्या – Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi)

अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो गौतम बुद्धआंकडे सांगू लागला. त्याच्या ह्या गोष्टी गौतम बुद्ध शांत चित्ताने ऐकत होते. तो शेतकरी अशा अनेक गोष्टी सांगत होता सांगत होता परंतु गौतम बुद्ध एका शब्दाने देखील बोलत नव्हते जो काही तो सांगत आहे ते मनःपूर्वक ऐकतच होते.सर्व काही सांगून झाल्यानंतर आता त्याच्याकडे काही सांगण्यासारखे उरलेच नव्हते तेव्हा तो शांत झाला. आपल्या मनातील सर्व काही सांगून तो मोकळे झाला किंबहुना त्यांनी त्याचे मन मोकळे केले आणि गौतम बुद्ध त्याला काहीतरी सल्ला देतील किंवा या गोष्टींमधून मार्ग काढून देतील या हिशोबाने तो गौतमबुद्धां कडून उत्तराची आस ठेवून बसला. (समस्या – Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi)

परंतु गौतम बुद्ध शांत बसले होते. त्यावर तो शेतकरी म्हणाला “गौतम बुद्ध मी खूप लांबून आलो आहे तुम्ही या समस्यावर मग काहीच उपाय सांगणार नाही का?” त्यावर गौतम बुद्ध म्हणाले मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही. यावर तो शेतकरी आश्चर्यचकित झाला. आणि म्हणू लागला “हे काय बोलताय? आपण सर्व लोक म्हणतात की आपण सर्व समस्या सोडवता तुम्ही माझी मदत का करत नाही? कारण मी एक गरीब शेतकरी आहे म्हणून?” त्यावर गौतम बुद्ध म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी तर आहेतच. अडचणी तर प्रत्येकाला येत असतात आणि जात ही असतात. कधी एखाद्या व्यक्तीला बाहेरचे आपले वाटतात कधी आपलेच लोक बाहेर ते वाटून जातात. हेच तर खरे जीवन आहे यातून कोणी सुटू शकत नाही.

खरेतर हे आहे की जो व्यक्ती या पृथ्वीतलावर जन्म घेतो त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संकटांना सामोरे जावे लागते. तू कितीही कठोर परिश्रम कर एक समस्या गेली की तुला दुसऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते हेच तर खरे सत्य आहे. हे सर्व गौतम बुद्धांचे बोलणे ऐकल्यावर त्या शेतकऱ्याला राग आला आणि तो गौतम बुद्धांना म्हणाला “सर्व लोक तर म्हणतात की तुम्ही प्रत्येक समस्यावर मार्ग काढून देता मला वाटले होते की तुम्ही माझी काहीतरी मदत कराल. आता तुम्हीही या समस्यांवर काही मार्ग काढू शकत नाही म्हणजे आता माझे इथे येणे व्यर्थ झाले. लोक खोटे बोलतात की तुम्ही सर्व समस्यांवर काही ना काही मार्ग काढून देता. तुम्ही तर माझ्या एका सुद्धा समस्येवर मार्ग काढून दिला नाही.” तुमच्यापेक्षा तर ते बाबा चांगली होते ते माझ्या घरी आले माझ्याकडून यज्ञ करून घेतला. त्यामुळे माझ्या आयुष्यात थोडा वेळ का होईना परंतु शांती समाधान होतेच.

यावर गौतम बुद्ध म्हणाले समस्या तर प्रत्येक व्यक्तीला आहेत तुझा तो यज्ञ केल्यामुळे तुझ्या समस्या कमी झाल्या? याउलट तुला तर जास्तच समस्या निर्माण झाल्या. यावर तो शेतकरी म्हणाला मग तुम्ही माझी एक सुद्धा समस्या सोडणार नाही का? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले मी फक्त तुझी एकच समस्या सोडवू शकतो जी म्हणजे तू सांगितलेली होती त्यातली एक सुद्धा नाही. त्या शेतकऱ्याला काहीच कळले नाही म्हणून गौतम बुद्धांना म्हणाला “मला काही समजले नाही.” (समस्या – Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi)

ही त्यावर गौतम बुद्ध म्हणाले तू आत्तापर्यंत जेवढ्या समस्या सांगितल्या आहेस त्या समस्यांचे उत्तर माझ्याकडे नाही. परंतु एका समस्याचे उत्तर आहे ते म्हणजे हे मान्य करणे की आयुष्यात प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी समस्या येते. तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख असावे परंतु तसे होऊ शकत नाही तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख असावे हे होणे शक्य नाही. आयुष्यामध्ये समस्या ह्या येणारच याशिवाय आयुष्य कसले. जर तू या समस्याला समस्यासारखेच पाहिलेस तर तुझी समस्या ही कधीच सुटू शकत नाही. परंतु तू जर समस्या ला समस्या सारखे पाहिलेच नाहीस तर ती समस्या तुझ्यासाठी समस्या राहणारच नाही. जेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्ती काही समस्या असते त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करीत असतो परंतु जेव्हा हीच वेळ आपल्यावर येते तेव्हा आपण काहीच करत नसतो किंबहुना त्या समस्येचा केंद्रबिंदू जाणून घेऊन त्यावर विचार देखील करत नसतो. म्हणून ह्या समस्यांना तू समस्यां सारखा पाहू नकोस. समस्या या हजारो वर्षापुर्वी देखील समस्या होत्या आणि भविष्यामध्ये येणाऱ्या यादेखील समस्याच आहेत.

भगवान बुध्दांचे हे वाक्य ऐकून तो शेतकरी नतमस्तक झाला.

Problem – Gautama Buddha’s philosophy inspiration Story

तात्पर्य: समस्या ह्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतातच. समस्या येणे हे माणसाची जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे या समस्यांना आपण समस्या न मानता त्यावर योग्य काम केली पाहिजे.

हे ही वाचा=====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका