Monsoon News 2022 : अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान खात्याकडून माहिती

Monsoon News 2022 :  अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान खात्याकडून माहिती

मुंबई :  सगळ्यांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने दक्षिण कोकणात जोरदार हजेरी लावली. गोव्यासह कोकणातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. इतकंच नाही तर यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांना मान्सून पावसाने झोडपलं. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. Monsoon finally arrives in Maharashtra, information from Meteorological Department

अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सूनने दणका दिला आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला, अशी हवामान खात्याने दिली आहे. इतकंच नाहीतर शनिवारी दुपारनंतर मुंबईत पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज ११ जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटक व काही भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे. Monsoon finally arrives in Maharashtra, information from Meteorological Department

हे ही वाचा ——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका