“कियान” नावाचा अर्थ माहिती आहे का? राज ठाकरेच्या नातवाचे नाव आहे कियान

“कियान” नावाचा अर्थ माहिती आहे का? राज ठाकरेच्या नातवाचे नाव आहे कियान

Kiyan Amit Thackeray’s Son Name

राज ठाकरेच्या नातवाचे म्हणजे अमित ठाकरे यांच्या मुलांचे नाव कियान ठेवले आहे. आज दिवसभर कियान नावाबाबत सोशलमिडीया तसेच मिडीया मध्ये कियान नावाचा अर्थ काय या विषय चर्चा होती तर अनेकजण गुगल करत होते तर काहीजण नाव हिंदु धर्मात यापूर्वी ऐकले नाही. तर काहीजण सदरील नाव क्रीश्चन असल्याचेही बोलले जात होते. “कियान” नावाचा अर्थ माहिती आहे का? Do you know the meaning of the name “Qian”? Raj Thackeray’s grandson’s name is Kian (Kiyan Amit Thackeray’s son name)

व्याकरण दृष्ट्या कियान हा पुल्लिंगी शब्द आहे. Do you know the meaning of the name “Qian”? Raj Thackeray’s grandson’s name is Kian कियान याची रास मिथुन आणि या राशीचा स्वामी बुध आहे…
संस्कृत अर्थ
कियान = किती
कियान म्हणजे आतंक असा ही यांचा एक अर्थ आहे…
कियान हा शब्द दुसर्या कोणत्याच धर्माशी संबंधित नाही आहे…

मराठी संस्कृत प्राकृत मध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात, जसे की पाणी या शब्दाला जल,अनल, हस्त, जिवन असे वेगवेगळे नाव आहेत. तसंच कियान या शब्दाचा अर्थ होतो. प्राचिन, ईश्र्वराची कृपा, दूर, राजा,
(अंकशास्त्रा नुसार कियान या शब्दाची उत्पत्ती कार्तिकेय, कायतान, या शब्दापासून झालीय असं थोर अंकशास्त्र अभ्यासक यांचे म्हणणे आहे.) “कियान हा शब्द भुतलावरील महाराष्ट्र देशीय लोकांनी प्रथमतः इ.स २०२२ मध्ये शुक्रवार दिनी राज ठाकरे यांचे नातू यांच्या नामकरण दिनी म्हणजेच आजच्या दिवशी पहिल्यांदाच ऐकला…”

सध्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत. ५ एप्रिल २०२२ रोजी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. मिताली या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. त्यानंतर राज ठाकरेंच्या नातवाचे नाव जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या नातवाचे नाव काय आहे? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत होते. आता सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव सांगितले आहे.

सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून राज ठाकरेंच्या नातवाचे नाव सांगितले आहे. ‘कियान अमित ठाकरे’ असे त्यांच्या नातवाचे नाव आहे. या आधी त्यांनीच फेसबूकवर पोस्ट शेअर करत “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट केली होती. तसेच त्यांनी, “युवराजांचं आगमन” असं लिहित राज ठाकरेंना नातू झाल्याचंही म्हटलं होतं. सचिन यांनी अमित ठाकरेंचंही अभिनंदन केल होतं.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे २०१९ साली लग्न झाले. त्यांच्या भव्य लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

या सोबतच मनसे न्यूज लाईव्ह या फेसबुक पेज वर खालील प्रमाणे अर्थ सांगितला आहे.

“किआन” अतिशय सुंदर नाव.हिंदू धर्माप्रमाणे संस्कृत भाषेत “किआन” चा अर्थ होतो “ईश्वराची कृपा”ईस्लाम नुसार “किआन” चा अर्थ होतो “सर्वशक्तिमान राजा”ख्रिश्चन धर्मानुसार “किआन” चा अर्थ होतो “निसर्ग”हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मानुसार किआनचा अर्थ कुठे तरी त्या सर्व शक्तिमान ईश्वाराशी संबंध दाखवतो जो निसर्गाच्या रुपाने सदैव आपल्याला काहितरी देत असतो.”किआन” ला आणि संपूर्ण ठाकरे कुटूंबियांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाचा ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका