शौर्यप्रतापी, साहित्यिक, बहुभाषा ज्ञान असणारे छत्रपती संभाजी राजे

शौर्यप्रतापी, साहित्यिक, बहुभाषा ज्ञान असणारे छत्रपती संभाजी राजे

छञपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य दुपटीने , सैन्य, शस्ञसाठा, राज्य खजिना तीन पटीने वाढविणारे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती संभाजी राजे रणमैदानावरील शौर्य गाजविण्यासोबत लेखन बहाद्दर ही होते .त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर सईबाईच्या पोटी झाला. सईबाई बाळांतपणापासून आजारी असल्याने त्यांचे निधन ५ सप्टेंबर १६५९ रोजी झाले .तेव्हा बाळ शंभूराजे साधारणतः अडीच वर्षाचे होते . त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी राजमाता जिजाऊ यांच्यावर आली .छञपती शिवरायांप्रमाणे बाळ शंभूराजे यांच्यावर संस्कार , शिक्षण ,घोड्यावर बसणे ,तलवार ,दांडपट्टा चालविणे , युद्ध नितीचे, राज्यकारभाराचे धडे दिले. Information Of Chatrapati Sambhaji raje History

सन १६६५ साली स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानाचे संकट आले .स्वराज्यात धुडगुस घातला ,रयतेला ञस्त करून सोडले तेव्हा छञपती शिवरायांना रयतेसाठी मिर्झा राजे जयसिंगा सोबत पुरंदरचा अपमानकारक तह करावा लागला .या तहान्वये स्वराज्यातील तेवीस किल्ले मुघलास द्यावे लागले .शंभूराजास वयाच्या आठव्या वर्षी मुघलाकडे पंचहजारी मनसबदार व्हावे लागले .याचा अर्थ बाळ शंभूराजे आठ वर्षाचे होते तेव्हा पासून छञपती शिवरायांसोबत प्रत्यक्ष राजनितीत सहभागी होते. Information Of Chatrapati Sambhaji raje History

स्वराज्यासाठी ,रयतेसाठी छञपती शिवरायांनी बाळ शंभूराजास मिर्झा राजे जयसिंगाकडे ओलीस ठेवले केवढा हा त्याग . तहान्वये मुघल बादशहा औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रा येथे छञपती शिवरायांना जायायचे होते सोबत शंभूराजे ही मनसबदार म्हणून गेले . औरंगजेबाच्या राजदरबारात शिवरायांना मागच्या पंक्तित उभे करून अपमानित केल्यांने छञपती शिवरायांनी औरंगजेबानी दिलेले वस्ञ भिरकावून भर सभेत दाखविलेला स्वाभिमान हे शंभूराजानी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे सहाजिकच हे गुण शंभूराजानी आत्मसात केले . Information Of Chatrapati Sambhaji raje History

शंभूराजे यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्याकडे दहा हजार सैन्याची फौज होती . विविध ठिकाणच्या युद्ध मोहिमांवर सैन्याचे नेतृत्व करत असत .छञपती शिवरायांनी शंभूराजास २६ जानेवारी १६७१ रोजी वयाच्या चौदाव्या वर्षी पन्हाळगडावर स्वतंत्र राजपद दिल्यांने ते स्वतंत्र राज्यकारभार करत होते . छञपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून शंभूराजांचे पटबंधन ही झाले होते . राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी छञपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली व मुघलानी स्वराज्यावर आक्रमण करू नये यासाठी शंभूराजास दिलेरखानाच्या गोठात पाठविले हा शिवनीतीचा भाग होता आणि यात शंभूराजे यशस्वी झाले .

३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर छञपती शिवरायांच्या निधन झाले की दुसरे काही अघटीत ( हा संशोधनाचा भाग आहे ) . ही बातमी मोरोपंत पिंगळे ,अण्णाजी दत्तो ,राहुजी सोमनाथ ,बाळाजी आवजी यांनी काही दिवस शंभूराजास माहिती होऊ दिली नाही ऐवढेच नव्हे तर स्वराज्याचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना हातासी धरून शंभूराजास अटक करून स्वराज्याची सुञे राजारामाच्या माध्यमातून त्यांना हाती घ्यायची होती . पण ते यशस्वी होऊ शकले नाही . १६ जानेवारी १६८१ रोजी शंभूराजे राज्याभिषेक करून स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती झाले . १६८१ ते १६८९ या नऊ वर्षाच्या कालावधीत स्वराज्याचे रक्षण व विस्तार करण्यासाठी २३०० विविध आघाड्यावर लढाया करून पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांस राज्य जिंकणारे , कर्नाटकातील स्वराज्य दुप्पट करणारे , औरंगजेबाच्या लाखोंच्या सैन्यास सळो की पळो करून सोडणारे ,इंग्रज ,फ्रेंच , डच , सिद्दीस वटणीवर आणणारे छञपती संभाजी राजे शुरवीर , पराक्रमी ,मुत्सद्दी ,न्यायी , प्रजाहितदक्ष ,निर्व्यसनी राजा होते .तरीही तथाकथित कलमकसाई कथा, कादंबरी ,नाटककारांनी शंभुराजे व्यसनी होते , व्यभिचारी होते असे लिहिले. असे जर असते तर रणमैदान गाजविणारे ,स्वराज्य वाढविणारे त्यांचे काय बाप होते का ? असे म्हणावे लागेल .

औरंगजेब बादशहांच्या लाखोंच्या सैन्यास स्वराज्यातील एक किल्ला ही जिंकता येत नसल्यांने बादशहा औरंगजेब आपल्या सैनिकास म्हणतो ,” मेरे सब सरदारोंके बजाय एक संभाजी मेरे पास होता तो हम कब के हिंदुस्थान के आलमगीर बन गये होते .” मराठ्यांचा कट्टर शञू मुघल इतिहासकार महम्मद हाशिम काफीखान म्हणतो, छञपती संभाजी राजे छञपती शिवरायांपेक्षा दहापटीने तापदायक राजे होते . फ्रेंच इतिहासकार लिहून ठेवतो ,संभाजी राजे छञपती शिवरायांप्रमाणेच चारित्र्यसंपन्न राजे होते असे शञूनी लिहिले . जागतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असा पराक्रम करणाऱ्या छञपती संभाजी राजास तत्कालीन इतिहास लेखकांनी रगेल व रंगेल , दुराचारी ,व्यभिचारी होता म्हणून आमच्या समोर सादर केले आणि आम्ही स्वीकारले . वि.दा.सावरकरांसारखे स्वातंत्र्यवीर म्हणतात, संभाजी राजे मदिरा व मदिराक्षीच्या आहारी गेले होते म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ,युगपुरुष मा.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब म्हणतात ,ज्यांच्या मांडीवर विश्वासाने डोके ठेवले त्यांनीच गळा कापला . ज्यांना वाचन लेखण करण्याचा अधिकार होता त्यांनीच ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा न लिहिता लिहिणाऱ्यानी त्यांचा इतिहास लिहिला .

संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात , शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी . राजमाता जिजाऊ व छञपती शिवरायांच्या संस्कारात वाढलेले दुसरे छञपती संभाजी राजे परस्ञी माते समान माणून सन्मान करणारे ,रयतेची काळजी घेणारे ,व्यसनापासून दूर राहणारे ,मुस्लिम मावळ्यांना समानतेची वागणूक देणारे ,विज्ञानवादी विचारांचे होते .अशा राजांची बदनामी का केली असा प्रश्न पडतो. वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभुषनम् हा राजनीतीवर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला .सातसतक, नखशिख, नायिकाभेद हे शृंगारिक व अध्यात्मिक हिंदी भाषेतील ग्रंथ लिहून कलमकसाई यांंची मक्तेदारी संपुष्टात आणली . शंभूराजास अठरा भाषा अवगत होत्या . Information Of Chatrapati Sambhaji raje History

छञपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करू लागल्याने आण्णाजी सारख्याचे स्वप्न भंग पावले .तीन वेळेस संभाजी राजास मारण्याचा कट रचला पण त्यात यश मिळाले नाही पण शेवटी ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेब बादशहाच्या हाताने मनुस्मृती संहिते प्रमाणे मारले . माणूस किती जगला या पेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे .छञपती संभाजी राजे फक्त ३२ वर्षच जगले पण या ३२ वर्षात जगावे कसे व मरावे कसे हा आदर्श आमच्या पुढे ठेवून गेले. Information Of Chatrapati Sambhaji raje History

मुखर्रखानानी पकडून औरंगजेब बादशहा समोर हजर केल्यानंतर बादशहाने संभाजी राजास विचारले , स्वराज्याचा खजिना कोठे आहे आणि कोणते मुघल सरदार फितूर आहेत हे सांगितल्यास जीवनदान देले जाईल संभाजी राजांनी मरण पत्करले पण स्वराज्याचा खजिना व फितूर सरदाराची नावे सांगितले नाही याला म्हणतात, विश्वास ,याला म्हणतात स्वराज्य प्रेम . . कथा ,कादंबऱ्या ,नाटक ,चिञपट हे इतिहास लेखनाची साधने होत नाहीत .

आणि याच साधनाच्या आधारे मराठ्यांची बदनामी केली आणि करत आहेत .चिञपटातून गावात अडीअडचणीत , दुःखात सर्व जाती धर्मातील लोकांना मदत करणारा मराठा दाखविला जात नाही तर खलनायक दाखवून मराठा समाजाची बदनामी केली जाते हे थांबविले पाहीजे . आजच्या तरूणांनी छञपती संभाजी राजांचा निर्व्यसनीपणा , स्ञियांचा सन्मान , भिन्न जाती धर्माचा आदर, विविध भाषेचे ज्ञान मिळवून ज्ञानाच्या कक्षा विस्तृत केल्यास निश्चितच राष्ट्राच्या विकासास दिशादर्शक ठरेल व खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल . Information Of Chatrapati Sambhaji raje History

Information Of Chatrapati Sambhaji raje History

हे ही वाचा=====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका