Information about Hutatma Chhatrapati Shivaji Maharaj IV Karveer Sansthan
छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले छत्रपती संभाजी महाराज आणि धाकटे छत्रपती राजाराम महाराज.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही काळानंतर महाराष्ट्रात मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या.थोरले चिरंजीव संभाजी महाराजांच्या वंशजांची सातारा गादी आणि धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांची कोल्हापूर गादी.ह्यापैकी कोल्हापूर गादीचे हे चौथे शिवाजी महाराज छत्रपती यांच्या विषयी हा आजचा लेख आहे.मी फार पूर्वी महाराष्ट्र धर्मवर एक लेख लिहिला होता.लेखाचे नाव होते ‘इटलीकरांचे’ लाडके राजाराम महाराज. हे दुसरे राजाराम महाराज इटलीतील फ्लोरेन्स येथे ‘निपुत्रिक’ वारले.ह्या राजाराम महाराजांच्या नंतर कोल्हापूर गादीस वारस कोणास घ्यावे असा प्रश्न उपस्थित झाला.
कोल्हापूर गादीच्या नवीन राजासाठी सात मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी खानवटकर घराण्याचे सावर्डे शाखेतील नारायण ह्या मुलास २३ ऑक्टोबर १८७१ रोजी पुढील कोल्हापूरचे छत्रपती म्हणून गादीवर बसविण्यात आले.ह्या चौथ्या छत्रपतींचा जन्म ५ एप्रिल १८६३ रोजी झाला होता.छत्रपती पदावर येते समई ह्या मुलाचे नारायण हे नाव बदलून चौथे शिवाजी महाराज असे नामकरण करण्यात आले. ह्या वेळी चौथ्या शिवाजी महाराजांचे वय ८ वर्ष होते.इंग्रज सरकारने ह्या चौथ्या शिवाजी महाराजांना के. सी आय. सारखा तत्कालीन बहुमानाचा किताब देऊन महाराजांच्या सुसंगत आणि स्वाभाविक वर्तनाची एक प्रकारेग्वाहीच दिली होती.
“मी स्वतंत्र आहे. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी ब्रिटिशांचा गुलाम नाही. मी प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा तीळभर कमी नाही छत्रपती म्हणजे सार्वभौम राजे असतात असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत , ब्रिटिशांविरुद्ध एकाकी लढा देत अवघ्या वीस वर्षांच्या राजांनी प्राणार्पण केले ते राजे , ते वीर हुतात्मा म्हणजेच “करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज”यांचा आज स्मृती दिवस (25 डिसेंबर 1883) आज चौथे छत्रपती शिवाजीमहाराज याचे पुण्यतिथी दिवस आहे “छत्रपती शिवाजी महाराज चौथे (करवीर संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा”
“हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान)”अहमदनगरमध्ये दिल्लीगेटच्या पुढे आल्यावर अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यु आर्टस्, काॅमर्स अँड सायन्स कॉलेज समोर रस्त्याच्या पुर्व बाजुस हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान) यांचे स्मारक आहे.चौथ्या शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे या गावी ५ एप्रिल १८६३ रोजी नारायण दिनकरराव राजेभोसले या नावाने झाला. महाराज उंचेपुरे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे होते. २३ ऑक्टोबर १८७१ रोजी विजयादशमीला ते करवीर गादीला दत्तक आले. महाराजांना घोडेस्वारी, शस्त्र आणि शास्त्र, राज्यकारभारात विशेष रुची होती.
मराठी, इंग्रजी, हिंदी व मोडी भाषेवर महाराजांचे प्रभुत्व होते. ब्रिटीश सरकारकडून रयतेची होणारी पिळवणूक आणि छळ महाराजांनी पाहिला होता त्याची महाराजांना जाणीव होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान होता आणि त्यांच्या पुण्याईने आपल्याला हे राज्य मिळाले आहे याची जाणीव होती. रयतेच्या कल्याणाची आपल्यावर जबाबदारी आहे याची त्यांना कल्पना होती. म्हणून महाराजांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.महादेव बर्वे नावाच्या ब्रिटीश धार्जीन्या हरामखोर कारभार्याने ब्रिटीशांच्या मदतीने महाराजांना वेढे ठरवून अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते.
महारांजना ग्रीन नावाच्या ब्रिटीश अंगरक्षकाच्या निगराणीखाली ठेवले होते ग्रीन हा महाराजांना सारखा छळत असे या साऱ्या त्रासाला महाराज कंटाळले होते यातच महाराजांची ब्रिटीश अंगरक्षक ग्रीनशी झटापट झाली यात ग्रीन या अंगरक्षकाने महाराजांच्या पोटात जोराचा लथप्रहार केला यात महाराजांचा मृत्यू झाला ती तारीख होती २५ डिसेंबर १८८३ परशुराम ऊमाजी भोसले यांनी महाराजांना अग्नी दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पित्याच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथे एका वसतिगृहाची स्थापना केली.”छत्रपती शिवाजी महाराज चौथे (करवीर संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा”
=======================================================
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला