मराठा क्रांती मोर्चाचा इतीहास सुरवात कशी झाली
मराठा क्रांती मुक मोर्चाच्या झेंड्याखाली मराठा समाजाने पाच वर्षापुर्वी आजच्याच 9 ऑगष्ट क्रांती दिनी औरांगाबाद येथुन सुरवात झाली होती आज त्याचा पाचवा वर्धापन दिन. 2016 साली राज्यभर मुकमोर्चाचे जे धुमशान घातले होते. मुंबई आजाद मैदान राज्यस्तरीय मोर्चा शेवट्चा त्यानंतर म्हणावा तसा समाज पुन्हा एकत्रीत आलाअ नाही. असे असले तरी तात्कालीन जे मोर्चे झाले ते ऐतिहासिक होते, लाखोंच्या संख्येने समाज या मोर्चांच्या माध्यमातून नुसता एकवटलाच नाही तर शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरला आणि आपल्या मागण्या शासनासमोर ठेवल्या. मोर्चांचे नियोजन, शिस्तबद्धता, साफसफाई या गोष्टी नुसत्या वाखाणण्याजोग्याच नव्हत्या तर कोणालाही आचंबीत करायला लावून अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणार्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेला समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडत असल्याने आणि कोठेही अनुचित प्रकार न घडता कसलेही गालबोट न लागल्याने या मोर्चांची दखल अगदी जागतिक पातळीवर घेण्यात आली आणि म्हणूनच हे मोर्चे ऐतिहासिक होते, इतिहासाने नोंद घ्यावी असेच होते.
मराठा क्रांती मोर्चांमुळे सरकार हादरले होते, आधी समाजानी कुणीही चर्चेला जाय्चे नाही अशी बालह्ट्टी भुमीका घेतली तर काही संघटना समिती नेमुन सरकारशी चर्चा करावी पण समाजातील दुही, दुफळी उफाळून वर आली आणि चर्चेला कोणीच जायचे नाही, सरकारने आमच्या सर्वांसोबतच चर्चा केली पाहिजे असा जणू बालहट्टच मोर्चेकर्यांनी घेतल्याने आणि ते सरकारला शक्य नसल्याने काहीही विशेष प्रयत्न न करता आणि कुठलेही नुकसान न होता मोर्चांचे पेव थंडावले, पर्यायाने हे पेल्यातील वादळ ठरले असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
कोपर्डीच्या ताईला न्याय देणे व मराठा आरक्षाणासह तात्कालीन वेळी इत्तर काही मागण्या होत्या. तदनंतर मागण्या वाढत 10 ते 11 झाल्या. मोठया संख्येने सामन्य मराठा यामधे सामील झाला होता. याचे कारण हा मोर्चा राजकीय नव्हता. महाराष्ट्रातील सामन्या घरातील मरठा समाज या मोर्चाच्या परिणामाची म्हणजेच माग्ण्या मान्य होण्याची वाट पहात होता. परंतु या मोर्चाचे फलीत मिळ्ण्याएवजी मुंबई मोर्चानंतर काही समन्वयक राजकीय लोकांच्या गळाला लागले आणी तिथेच जागतीक नोंद घ्यावी अशा एताहसीक मोर्चाचे पानीपत झाले.
युध्दात जिंकलेला परंतु तहात हरलेल्या या समाजाचा दबावगटाची हवा निघाल्याने तत्कालीन सरकारने 2013 प्रमाणेच समितीचा आयोग नेमुन ESBC एवजी SEBC नावाने 50% च्या वरील आरक्षण जाहीर केले आणी. याच त्रुटीचा धागा पकडुन पुन्हा काही मराठा व्देष्टे कोर्टात गेले आणी हायकोर्टाने याला पास केले परंतु सुप्रीम कोर्टात या धक्कादायक निकाल देउन मराठा आरक्षण रद्द केले.
आता मराठा समाज पुम्हा रस्त्यावर येऊन आरक्षाणाची मागणी करत आहे. परंतु आता समाज जागरुत झाला आहे. केवळ OBC मधुनच 50% आत आरक्षण दयावे अशी मागणी करत आहेत.