महाविकास आघाडी सरकार गॅसवर; एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांची बंडखोरी सुरूच

महाविकास आघाडी सरकार गॅसवर; एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांची बंडखोरी सुरूच

Mahavikas Aghadi government in danger; Shiv Sena MLAs continue to revolt with Eknath Shinde

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022) Mahavikas Aghadi government in danger zone; Shiv Sena MLA’s revolt with Eknath Shinde continues

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. (Shivsena in MLC Election 2022)

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे अंदाजे 30 च्या आसपास आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं सरकारमधलं आणि शिवसेनेतलं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घ्या…(Who is Eknath Shinde, What is his importance in politics)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर नाराज एकनाथ शिंदेंची मनधरणी करायला सूरतला गेले होते. शिंदे आणि नार्वेकर यांचे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आता शिंदेंची घरवापसी आणि बंडामुळे जाऊ शकणारं मुख्यमंत्रीपद वाचवण्याची जबाबदारी नार्वेकरांच्या खांद्यावरच आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदेंना थेट निरोप देण्यात आला आहे. आपण चर्चेसाठी तयार आहोत, पण अटीतटींचं राजकारण मान्य नाही, असा इशाराच शिवसेनेने शिंदेंना दिला आहे.

हे ही वाचा —–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका