धिरेंद्र शास्त्री बागेश्ववर यांना दैविक सिध्द प्राप्त आहे की हा वैज्ञानिक माईंड रिडर खेळ आहे – वाचा राजरत्न आंबेडकर यांचे मत

धिरेंद्र शास्त्री बागेश्ववर यांना दैविक सिध्द प्राप्त आहे की हा वैज्ञानिक माईंड रिडर खेळ आहे – वाचा राजरत्न आंबेडकर यांचे मत

ही मुलगी सुहानी शाह आहे… वयाच्या 7 व्या वर्षापासून ती जादूची कला सादर करतेय. स्वतःला फक्त जादूगार पर्यंत मर्यादित न ठेवता, काळासोबत बदलत तिने स्वतःला माईंड रीडर, मेंटलिस्ट, ईल्यूजनिस्ट म्हणून सादर केले आहे. ही सुहानी शाह, बागेश्वर ने जे चमत्कार दाखवले त्याच्या पेक्षा पुढचे चमत्कार हिने लाईव्ह टीव्ही वर दाखवले. Dhirendra Shastri Bageshwar has divine proof that this is a scientific mind reader game.

याउलट समाजात असे अनेक लोक आहेत जे हीच कला धर्माची चादर ओढून सादर करतात. बागेश्वर हे त्याचे ताजे उदाहरण आहे. असे उदाहरण तुम्हाला सर्व धर्मांमध्ये दिसतील. तसं पाहायला गेलं तर सुहानी आणि बागेश्वर यांच्या वयामध्ये जास्त फरक नाही.. दोघेही एकसारख्याच कला सादर करतात. परंतु फरक इतकाच आहे की सुहानी स्वतः जे काही करते त्याला कला, मनोरंजन असे म्हणते… तर बागेश्वर आणि त्यांच्यासारखे इतर धर्मातील लोक या गोष्टीला दैवी शक्ती वगैरे सांगून लोकांना मूर्ख बनवतात.

सुहानीने ABP NEWS या चॅनलवर Live कार्यक्रमात लोकांच्या मनातील गोष्टी ओळखून दाखवल्या.. ज्या लोकांच्या मनातील गोष्टी ओळखून दाखवल्या ते लोक थक्क झाले.. हे कसं काय शक्य आहे!!

आज सुहानीने देखील एखाद्या धर्माची चादर ओढत तिचे कार्यक्रम सुरू केले तर लाखो लोक आपल्या याचना घेऊन तिच्या दरबारात हजेरी लावतील… पण ती तसे करणार नाही, कारण ती या गोष्टीला एक कला समजते. लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार मला नाही असे ती मानते.

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अश्या सर्वच धर्मामध्ये बागेश्वर आहेत.. त्या त्या समाजातील सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन यावर समाजप्रबोधन करणे खूपच गरजेचे आहे.

राजरत्न आंबेडकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका