12वी पास करीअरच्या नव्या वाटा ‘डेटा ॲनालिस्ट’- डिजिटल जगातील एक सर्वोत्तम करिअर !

12वी पास करीअरच्या नव्या वाटा ‘डेटा ॲनालिस्ट’- डिजिटल जगातील एक सर्वोत्तम करिअर !

जग बदललंय… डिजिटल झालंय ! त्याबरोबरच आपल्या देशाच्या प्रगतीच्या गाडीलाही बरीच ‘डिजिटल’ चाकं लागली आहेत ! अर्थात, अनेक गोष्टी डिजिटल झाल्याने आपण झपाट्याने प्रगती करीत आहोत. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबरच बँकिंग, हेल्थ केअर, एज्युकेशन, सर्व्हिस प्रोव्हायडर अशा सर्वच क्षेत्रांनी डिजिटलायझेशनसाठी आपली दारे खुली केली आहेत. Data Analyst – One of the best careers in the digital world!

भारतात तर हे डिजिटलायझेशन वारे सामान्य आणि अतिसामान्य माणसापर्यंत पोहोचले आहे. प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या या डिजिटलायझेशनचा फायदा व्यावसायिक क्षेत्राने घेतला नसता तरच नवल आहे. डिजिटल तंत्रज्ञान आता व्यवसाय वृद्धीसाठी, व्यवसायातील नवनवीन शिखरे गाठण्यासाठी वापरले जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने व्यवसायाची प्रगती करताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणी बजावत असेल तर तो आहे ‘डेटा’ ! Data Analyst – One of the best careers in the digital world!

उपलब्ध डेटावरून ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांची मानसिकता, बदलते ट्रेंड अशा बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेता येतो आणि त्यानुसार कंपनीला मार्केटिंग, फायनान्स, ग्राहकांची गरज, त्यानुसार बाजारात आणावयाचे उत्पादन याविषयी निर्णय घेता येतात. त्यामुळेच कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी ‘डेटा ॲनालिसीस’ करणे गरजेचे झाले आहे आणि म्हणूनच ‘डेटा ॲनालिस्ट’ या पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

२०१८ मध्ये जागतिक बाजारपेठेतील डेटा ॲनालिसीस या क्षेत्रातील उलाढाल ३७.३४ अब्ज रुपये एवढी होती. ही उलाढाल २०२७ पर्यंत १२.३ टक्क्यांनी वाढून १०५.०८ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या आकड्यांवरून या क्षेत्रात येणाऱ्या करिअर लाटेचा… नव्हे; तर सुनामीचा आपण नक्कीच अंदाज लावू शकतो. २०२० मध्ये एकट्या अमेरिकेत डेटा ॲनालिस्ट पदासाठी २७ लाख जागा उपलब्ध होत्या.

केवळ अमेरिकाच नव्हे; तर संपूर्ण जग आता कुशल ‘डेटा ॲनालिस्ट’च्या शोधात आहे.२०२२ अखेरपर्यंत जगातील ७० टक्के कंपन्या डेटा ॲनालिसीस तंत्राचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या कुशल डेटा ॲनालिस्टना आपल्या कंपनीत सामावून घेणार आहे.थोडक्यात काय, तर प्रगत तंत्रज्ञानामुळे डेटा हाताळणाऱ्या, त्यावर संशोधन करणाऱ्या कुशल उमेदवारांना आता देशभरातच नाही; तर जागतिक बाजारपेठेतही प्रचंड मागणी आहे. तेव्हा उत्तम करिअरच्या शोधात असाल, तर ‘डेटा ॲनालिस्ट’ हा सर्वोत्तम पर्याय आहे !

Data Analyst – One of the best careers in the digital world!

=====

One thought on “12वी पास करीअरच्या नव्या वाटा ‘डेटा ॲनालिस्ट’- डिजिटल जगातील एक सर्वोत्तम करिअर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका