Sambhaji Raje: मांजरेकर गाठ माझ्याशी..; संभाजीराजेंनी दिला दम

Sambhaji Raje: मांजरेकर गाठ माझ्याशी..; संभाजीराजेंनी दिला दम

पुणे – मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढाओढ लागली आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत आहेत. मात्र नुकताच आलेला हरहर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यावरून वाद निर्माण झाला आहे. (Mahesh Manjrekar news in Marathi) This cannot work for Chhatrapati Shivaji Maharaj’s film. In the film Har Har Mahadev, history is broken and perverted

छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्नही संभाजी राजे यांनी उपस्थित केला.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजी यांनी विचारलं. This cannot work for Chhatrapati Shivaji Maharaj’s film. In the film Har Har Mahadev, history is broken and perverted

दरम्यान इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली. This cannot work for Chhatrapati Shivaji Maharaj’s film. In the film Har Har Mahadev, history is broken and perverted

इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. लोकांनी असे चित्रपट बघू नये, अस आवाहन करताना आपण सेन्सॉर बोर्डाला पत्र देणार असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता, असंही ते म्हणाले. This cannot work for Chhatrapati Shivaji Maharaj’s film. In the film Har Har Mahadev, history is broken and perverted

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका