पुरंदरे यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर विसर्जन करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला

पुरंदरे यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर विसर्जन करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला

Attempt to dump Purandare’s bones and ashes on Raigad fort

रायगड: नाटककार बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा शिवभक्त मराठा सेवक कु.पुजाताई झोळे, वैशालीताई बेलदरे, प्रदीप बेलदरे, व त्यांच्या इत्तर सहकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. अशी माहिती त्यांनी पोलिसांना ही दिली असून या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अस्थी ११ किल्ल्यावर करणार असल्याचे घोषित केल्यानंतर शिवप्रेमी कडून विरोध झाला महाराष्ट्रत मोठे वादंग निर्माण झाल्यावर पुरंदरे स्नेहीकडून किल्यांवर अस्थी विसर्जन होणार नसल्याचेही जाहीर केले होते. परंतु वरील शिवभक्तकडून असा दावा केला जात आहे की, पुरंदरे यांच्या अस्थी काही किल्लेवर गोपनीय पद्धतीने टाकाल्याचा संशय आहे.

काल असाच लपूनछपून किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा शिवभक्त मराठा सेवक कु.पुजा झोळे, वैशालीताई बेलदरे, प्रदीप बेलदरे, व त्यांच्या इत्तर सहकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. अशी माहिती त्यांनी पोलिसांना ही दिली असून या प्मरकरणी महाड तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती महाड पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी किल्ले रायगडावर घेऊन दोघे जण आले होते. हे दोघेही पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघांनी राखसदृश्य वस्तू आणि पुस्तकाची पूजा करताना छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर दिसून आले. या दोघांना किल्ल्यावर काहींनी विरोध केला. त्यानंतर या घटनेची माहिती महाड तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस किल्ले रायगडावर पोहोचले. त्यांनी संबंधित दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांनीही जेवणाच्या डब्यात अस्थी आणल्या होत्या, अशीही माहिती समजते.

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील वस्तू आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद महाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. महाड तालुका पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका