अमरावतीत केमिस्टचा गळा चिरून खून, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्येचा संशय

अमरावतीत केमिस्टचा गळा चिरून खून, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्येचा संशय

अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड केल्याने त्यांची हत्या झाल्याचे डीसीपी उमेश साळवे यांनी सांगितले याचा अर्थ जिहादी मानसिकतेच्या गुन्हेगारांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणी अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांनीही नुपूर शर्मा प्रकरणातूनच हत्या झाल्याच्या घटनेला पत्रकार परिषदेत दुजोरा दिला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यानेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. The murder of a chemist by slitting his throat in Amravati was posted in support of Nupur Sharma

उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि एटीएसचे पथक अमरावतीत पोहोचले आहे. The murder of a chemist by slitting his throat in Amravati was posted in support of Nupur Sharma

पूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे. Chemist strangled to death in Amravati, posted in support of Nupur Sharma

उमेश कोल्हे यांचे बंधू मकरंद कोल्हे यांनी देखील आपल्या भावाने नुपूर शर्मा असे संबंधित काही पोस्ट फक्त काही ग्रुप्सना फॉरवर्ड केल्या होत्या. यात त्याचा कोणताही गुन्हा नव्हता. केवळ पोस्ट फॉरवर्ड केल्याने जर हत्येसारखी घटना घडत असेल तर काय बोलायचं? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. The murder of a chemist by slitting his throat in Amravati was posted in support of Nupur Sharma

कधी झाली होती हत्या?

उमेश कोल्हे हे मंगळवार दि.21 जून रोजी रात्री तहसील कार्यालय परिसरातील आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून मुलगा संकेत (27) व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीत तिघांनी लूटमारीच्या उद्देशाने उमेश यांना अडवून चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हेच्या हत्येची योजना आठवडाभरापासून आखली जात होती. 54 वर्षीय कोल्हे यांनी नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या.

या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींपैकी एक आरोपीने आपल्या कबुली जबाब नुपूर शर्मा तिच्या समर्थनाच्या पोस्टचा उल्लेख केला आणि त्यातून या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वेगळे वळण लागले आहे. Chemist strangled to death in Amravati, posted in support of Nupur Sharma. The murder of a chemist by slitting his throat in Amravati was posted in support of Nupur Sharma

हे ही वाचा ——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका