बीड- विनायक तुकाराम मेटे (३० जून १९७० – १४ ऑगस्ट २०२२) हे बीड जिल्हा केज तालुक्यातील राजेगाव हे त्यांचे मूळगाव. कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण ग्रामीण गरीब कुटुंबातून संघर्षातून पुढे आलेले नेते होते. ते शिवसंग्राम या शिवप्रेमी संघटनाचे ते संस्थापक होते. माजी आ. विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने मराठा आरक्षणाची बुलंद तोफ आज शांत झाली शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मेटेंच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. Who is Vinayak Mete? Learn about the family’s political journey
विनायक मेटेंच्या कुटुंबांबद्दलची माहिती –
1996 पासून आमदार असलेल्या विनायक मेटेंचा संघर्षमय राजकीय प्रवास राहिला. आई लोचनाबाई वडील तूकाराम विनायक मेटे यांना दोन भाऊ आहेत. रामहरी तुकाराम मेटे आणि त्र्यंबक तुकाराम मेटे अशी त्यांच्या भावांची नावं आहेत. त्यांना राजकीय वारसा लाभला नसला मेटे यांच्या मुळे त्यांचे भाऊ सक्रिय राजकारणात आहेत. मेटे यांच्या पत्नी मात्र राजकारणापासून दूर आहेत. त्या वरिष्ठ अधिकारी आहेत. विनायक मेटे यांनी पदवीपर्यंत (बी.ए.) शिक्षण घेतलेलं होतं. 1996 पासून विधान परिषदेच्या माध्यमातून मेटे सक्रिय राजकारणात आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव डॉ. ज्योती आनंदराव लाटकर-मेटे असं आहे. त्या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विनायक मेटे यांना दोन मुलं असून, त्यांच्या मुलाचं नाव आशुतोष विनायक मेटे (वय १८), तर मुलीचं नाव आकांक्षा विनायक मेटे (वय २१) आहे. Who is Vinayak Mete? Learn about the family’s political journey
विनायक मेटेंचा राजकीय प्रवास-
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यानं आवाज उठवणारे आणि त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते, अशी विनायक मेटे यांची ओळख होती.विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्र स्मारक समितेचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते.मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायक मेटे सामाजिक चळवळीत उतरले. 1994च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन युतीला पाठींबा दिला होता. Who is Vinayak Mete? Learn about the family’s political journey
1986 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी काम सुरू केलं होतं. 1987 मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली होती.
1994 मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.
1995 मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना केली होती. 1998 मध्ये नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापनाही विनायक मेटेंनी केली होती.विनायक मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. 1999 मध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं . 2002 मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली होती.
विनायक मेटेंची विधिमंडळ कारकीर्द –
31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000 या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेत गेले. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. 28 जुलै 2000 ते 27 जुलै 2006 मध्ये ते आजपर्यंत ते विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतून निवडून गेले होते. सलग ते पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते. शिवसेना- भाजप युती सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांचं युतीशी बिनसल आणि त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला. त्यानंतर राष्ट्रवादीनेही 2 वेळा विधान परिषदेवर संधी दिली. या काळातही मेटे सत्ताधारी पक्षातील आमदार होते.
2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केला. यानंतरही भाजप सत्तेत आला. पक्षांतरामुळे त्यांची गेलेल्या आमदारकीची अर्धी टर्म त्यांना भाजपने दिली. त्यानंतर भाजपनं पुन्हा त्यांना संधी दिली. आताचा अडीच वर्षांचा काळ सोडता विनायक मेटे आमदारही होते आणि विशेष म्हणजे सत्तेतही असत.
2014 सालापासून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सुरुवात केली. तेव्हा भाजप लाट असतानाही त्यांनाच बीडमधून पराभव पत्करावा लागला. तर 2017च्या नगर पालिका निवडणुकीत बीडमध्ये त्यांच्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा पुरता पाडाव झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाने चांगली चमक दाखवली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला सत्ताही मिळाली. नंतर मात्र चारही जिल्हा परिषद सदस्य व तीन पंचायत समिती सदस्य त्यांना सोडून गेले.
भाजप, राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या मेटेंची उठबस कायम बड्या नेत्यांमध्ये राहिली. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले.”समाजासाठी परखड भूमिका मांडणारे एकमेव आमदार होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. Who is Vinayak Mete? Learn about the family’s political journey