आज कोल्हापूर येथे राजर्षी शाहू छत्रपती
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची दिशा जाहीर केली. त्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला. (First Maratha Morcha) हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी आहे. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. (Maratha Morcha Kolhapur Live update today Maharashtra Maratha reservation demands by Sambhaji Raje Chhatrapati)
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोठ्या पावसात हा मराठा मोर्चा काढण्यात आला.
महाराज समाधीस्थळ येथे झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्व स्तरांवर प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी कोल्हापूरचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना, “मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे एकटे लढत आहेत. सर्व मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे एकजूटीने उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे,” असे आवाहन केले.
आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर यांनीदेखील उपस्थित राहून मराठा समाजास आपला पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयक, शासकीय नियुक्त्या रखडलेले उमेदवार, विद्यार्थी व मराठा समाजासहीत इतर समाजांचे बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.