काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता का निर्माण झाली ?

काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता का निर्माण झाली ?

Why did violence escalate in Kashmir Valley after Kashmir Files movie?

काश्मीर फाईल्स चित्रपट रिलीज झाल्यावर काही दिवसांनी BBC ने जम्मू आणि दिल्लीतील छावण्यांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांशी संवाद साधला होता.त्यात तेव्हा बहुसंख्य काश्मिरी पंडितांनी सांगितलं होतं,”या चित्रपटाने आता आमच्या पुन्हा काश्मीर खोऱ्यात जाऊन वसण्याच्या उरल्यासुरल्या सगळ्या आशा संपुष्टात आणल्यात.या चित्रपटात दाखवलेल्या अतिरंजित,अवास्तव घटनांनी काश्मिरी मुस्लिम आणि आमच्यात सांधत आलेली दरी पुन्हा प्रचंड रुंदावली आहे..” (Why the unrest in Kashmir Valley after Kashmir Files movie?)

केवळ ते पंडितच नव्हे तर या देशातील असंख्य समजूतदार, विचारी लोकही त्यावेळी हेच सांगत होते. परंतु या देशात विशेषत्वाने मागील काही वर्षात मुस्लिमद्वेषातून आसुरी आनंद मिळवणारी जी हिंस्त्र आणि विकृत पैदास झालेली आहे त्यांना हे मान्य नव्हतं.वंदे मातरम आणि जय श्री रामच्या गळेफाडू धिंगाण्यात त्या चित्रपटाचे विशेष शो सर्वत्र सुरु होते.देशाचे पंतप्रधानही त्या चित्रपटाचा पुरस्कार करीत होते ! (Why the unrest in Kashmir Valley after Kashmir Files movie?)

शेवटी व्हायचं तेच झालंय.. काश्मीरमधील वातावरण पुन्हा बिघडलंय. बिगर काश्मिरी लोकांवरील हल्ले वाढलेत,हत्या होवू लागल्यात. Why did violence escalate in Kashmir Valley after Kashmir Files movie? त्यामुळे भयभीत होवून कालपरवा तर रस्त्यावर उतरून सगळ्या बिगर काश्मिरी सरकारी व खाजगी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी श्रीनगरमध्ये मोर्चे काढून आम्हाला इथून लवकर बाहेर काढाचा टाहो फोडलाय.बाहेर गेलेल्या पंडितांना पुन्हा इथे आणणं तर दूरच राहिलं उलट दोनचार हजार पंडित जे अजूनही तिथे टिकून होते तेही आता जम्मूची वाट धरायच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.. (Why the unrest in Kashmir Valley after Kashmir Files movie?)

काश्मीरबाहेरच्या थिएटर्समध्ये तो चित्रपट पाहताना जय श्री राम आणि वंदे मातरमचे नारे देणाऱ्या सगळ्या शूरवीरांनी आता खरंतर आपल्या लाठ्याकाठ्यांसह तिकडे जाऊन आपल्या बांधवाना संरक्षण द्यायला हवं.पण ते होणार नाही.त्यांची मर्दुमकी इथे एखाद्या एकट्या मुस्लिम मुलीसमोर गँगने जाऊन जय श्रीरामच्या घोषणा देणे किंवा समूहाने जाऊन मशिदींवर भगवा लावणे यातच..! (Why the unrest in Kashmir Valley after Kashmir Files movie?)

हे ही वाचा ——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका