रायगड किल्ल्यात बेकायदेशीरपणे मशीद सदृश बांधकाम, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

रायगड किल्ल्यात बेकायदेशीरपणे मशीद सदृश बांधकाम, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Mosque constructed illegally within Raigad fort, Yuvraj Sambhajiraaje asks

महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान असलेल्या छत्रपतीच्या गडकोटांपैकी एक प्रतिष्ठित स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर मशिदीचे बांधकाम केल्याचे दगडाला पांढर लावलेलं व हिरवा झेंडा असलेला फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नियम वाऱ्यावर सोडून मशीद बांधली जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

राजधानी रायगड किल्यावर अगदी किरकोळ दुरुस्तीसाठी देखील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI),ज्यांच्या अधिपत्याखाली किल्ला आहे, त्यांची परवानगी आवश्यक आहे. तरी असे काम कधी झाले या विषयी लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत.

दोन दिवसापूर्वीच जेष्ठ इतिहास अभ्यासक अप्पा परब यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला त्यामध्ये त्यांनी भाजप सरकार गेले आणी रायगड किल्ल्यावर सोमजाई व झोलाई मंदीर पाडुन त्याठिकाणी मशीद बांधकाम केल्याचा व्हिडीओमध्ये अप्पा परब बोलल्याचे दिसत आहेत. याप्रकरणावर सोशलमीडिया राजकीय रंग देऊन अप्पा परब यांना भाजपप्रेमी असल्याचे कमेंट पाहायला मिळाल्या

याप्रकरणी युवराज संभाजींराजेंनीनुकतेच एक पत्र सोशलमिडीयावर टाकले असून त्यांनी आपल्या पत्रात शिवाप्रेमीनी रायगड किल्ल्याच्या परिसरात मशीद बांधल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. असे सांगितले आहे. अश्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी अशा वास्तू उभारणे बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “रायगड किल्ल्यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणे दुर्दैवी आहे,” असे त्यांनी लिहिले.

शिवाय, किल्ल्याचे चारित्र्य, पावित्र्य आणि ऐतिहासिकता जपण्यासाठी मशीद तात्काळ हटवणे आवश्यक आहे, असे सांगून किल्ल्याच्या आवारातील कोणत्याही बांधकामावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका