Who is Kalicharan Maharaj who made offensive remarks about Father of the Nation Mahatma Gandhi in Parliament?
कालीचरण महाराजांविरोधात प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरून कलम 294, 505(2) यांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गुन्ह्याचं घटनास्थळ रायपूर (छत्तीसगड) असल्यानं तिथं शून्य कलमाअंतर्गत वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे पुढील तपास रायपूर पोलीस करतील, अशी माहिती अकोला पोलिसांनी दिली. Who is Kalicharan Maharaj who made offensive remarks about Father of the Nation Mahatma Gandhi in Parliament?
अकोल्याच्या कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. छत्तीसगडची राजधानी इथे भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं. त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. महात्मा गांधींबाबत अपशब्द काढणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात रायपूर महापालिकेचे सभापती आणि काँग्रेस नेते प्रमोद दूबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्रमोद दूबे हे या धर्मसंसदेचं आयोजन करणाऱ्यांपैकीच एक होते.
कालीचरण महाराज कोण आहेत?
यापूर्वी शिवतांडव स्त्रोताचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं कालीचरण महाराज प्रकाशझोतात आले होते. कालीचरण महाराज नावाने प्रसिद्ध असलेल्या या महाराजांचं मूळ नाव हे अभिजित सराग असं आहे. ते मूळचे अकोल्याचे असून येथील शिवाजीनगर भागात भावसार पंचबंगला याठिकाणी ते राहतात आणि अकोल्यामध्ये त्यांचं बालपण गेलं आहे, असं स्थानिक पत्रकार उमेश अलोणे सांगतात. कालीचरण महाराजांच्या शिक्षणाबाबत नेमकी माहिती मिळाली नाही मात्र आठवीपर्यंत त्याचं शिक्षण झालं असल्याचं काही स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यांच्या जुन्या आयुष्याविषयी माहिती देणं ते शक्यतो टाळतात असं स्थानिकाचं म्हणणं आहे.
कालीचरण महाराज, हिंदू धर्म, धर्मसंसद, महात्मा गांधी”वयाच्या दहाव्या वर्षी एका अपघातात माझा पाय तुटला होता. माझा पाय 90 अंशांमध्ये वाकडा झाला. दोन्ही हाडं तुटली होती. मात्र त्याचवेळी स्वतः कालीमाता प्रकट झाली आणि मातेनं माझा पाय ओढून तो पुन्हा जोडला.” “एवढा भयंकर अपघात घडल्यानंतरही पायाचं ऑपरेशन करावं लागलं नाही, रॉड टाकावा लागला नाही, हा मोठा चमत्कार होता. तेव्हाच मला कालीमातेचं दर्शन झालं आणि मी कालीमातेसाठी वेडा झालो.
“रात्री झोपेतही मी कालीमातेचा धावा करायचो असं माझी आजी म्हणायची. त्यानंतर कालीमातेची पुजा मी करू लागलो आणि धर्माविषयी मला आवड निर्माण झाली. मी कालीपुत्र कालीचरण बनण्याची सुरुवात तिथंच झाली होती,” अशी कथा कालीचरण सांगतात. महर्षी अगस्त्य ऋषी हे माझे गुरू असल्याचं कालीचरण वारंवार सांगतात. विशेष म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी अगस्त्य ऋषींनी प्रकट होऊन दर्शन दिलं होतं, असा दावाही ते करतात. महर्षी अगस्त्यांनी मला लाल कपडे घालायला सांगितले असंही ते म्हणतात. पण ते साधू नाहीत असंही ते म्हणतात. त्याचं कारण देताना ते म्हणतात: “साधू शृंगार करत नसतात. मात्र मला जरीचे कपडे आवडतात, मी कोरून कुंकू लावतो, दाढी करतो त्यामुळं मी स्वतःला साधू म्हणत नाही.” Who is Kalicharan Maharaj who made offensive remarks about Father of the Nation Mahatma Gandhi in Parliament?
एका व्हीडिओनं प्रसिद्धी
कालीचरण गेल्या वर्षी म्हणजे जून 2020 मध्ये एक व्हीडिओ व्हारल झाल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्ध झाले. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये असलेल्या भोजेश्वर मंदिरात त्यांनी गायलेल्या शिवतांडव स्त्रोताचा हा व्हीडिओ होता. Who is Kalicharan Maharaj who made offensive remarks about Father of the Nation Mahatma Gandhi in Parliament?
कोरोनाबाबत अवैज्ञानिक प्रचार
काही दिवसांपूर्वीच कालीचरण महाराजांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जागतिक आरोग्य संस्था (WHO) ही बनावट संस्था आहे आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर, वैज्ञानिक सगळे आमच्या दृष्टिकोनातून बनावट आहेत, असं ते म्हणाले होते. लशीच्या कंपन्यांबरोबर त्यांचं संगनमत आहे. ठराविक लस विकली जावी म्हणून मोठ्या प्रमाणात भीती पसरवण्याचं काम करण्यात आलं, असंही ते म्हणालं. लोकांना मारून त्यांचे मृतदेहही कुटुंबीयांना दिले नाही. त्यामुळं त्यांचे किडनी किंवा डोळे असे अवयव काढले असू शकतात, अशी शंकाही त्यांनी मांडली होती. पण एवढे आरोप करताना याबद्दलचा एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत.
हे ही वाचा ———————
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला