मराठा आरक्षणासाठी परतूर येथील सदाभाऊ भुंबर यांची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी परतूर येथील सदाभाऊ भुंबर यांची आत्महत्या

Suicide of Sadabhau Bhumbar at Partur for Maratha reservation

शिक्षण झालं पण नोकरी नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम आहे. पुण्यात नोकरी केली पण अपेक्षीत पगार नाही. गावी येवून शेती केली तर ओला दुष्काळ.  व्यवसाय करावा तर त्यासाठी भांडवलं नाही. मग जगायचं कसं या विवंचनेमध्ये दिवंगत सदाभाऊ भूंबर (वयं २२)

रा. येनोरा तालुका परतूर जिल्हा जालना येथिल एका दुर्देव भावाने आत्महत्या केलीयं. Suicide of Sadabhau Bhumbar at Partur for Maratha reservation

मराठा आरक्षणाच्या राजकारणाचा जोर वाढत असतानाच मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. ही खदखद कोणी समजून घ्यायला तयार नाही. नोकरी नाही. शेती तोट्यात. जगायला साधन नाही. मग करायचं काय ? खचलेल्या मनसिक अवस्थेमध्ये अनेक तरूण दिसतात. पण राजकारण करणाऱ्यांना याचं काहीच देणेघेणे नाही. Suicide of Sadabhau Bhumbar at Partur for Maratha reservation

आत्महत्या करण्यासाठी मानसिकता काही वेळेत किंवा एका क्षणात तयार होत नाही, परिस्थिती अशी निर्माण केली जाते की तुम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय दिसत नाही. मराठा समाजाच्या अनेक तरुणांच्या समोर जगण्याची गंभीर समस्या उभी आहे. आत्महत्येचं कधीच समर्थन होणार नाही. मात्र गेंड्याची कातडीच्या राजकारण्यांना जाग आणण्यासाठी ही पोरं असं चुकीचं पाऊल उचलत आहेत. हे वेळेतच थांबवायला हवाय. 

आत्महत्या करण्यापूर्वी सदाभाऊने लिहून ठेवलेले चिट्टी वाचताना डोळ्यात पाणी उभे राहतं. त्याच्या मनाची घालमेल काय असू शकते ते समजून येतं. सदाभाऊंच्या घरच्यांची समजूत तरी कशी काढायची ? मित्रांनो आभाळ फाटले हे मान्य आहे, मात्र त्याला ठिगळं लावण्याची हिम्मत आपल्यात आहे. खचू नका.

 आत्महत्येचा मार्ग अवलंबून नका. मराठा आरक्षण हा आपला हक्क आहे आणि आपण तो मिळवणार आहोत पण त्यासाठी तुम्ही जिवंत असायला हवेत. 

फोटो – १) दिवंगत सदाभाऊ भूंबर (गाव  येनोरा तालुका परतूर जिल्हा जालना)

२) आत्महत्येपुर्वी लिहलेली चिट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका