‘सनबर्न’ म्हणजे उच्चभ्रू घरातील पाश्चात्य संगीतवर हैदोस घालणारी मद्यधुंद मुलमुली

सनबर्न हा वादग्रस्त ‘सनबर्न’ फेस्टिवल 2016 वर्षापासून पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. या वर्षीचा
पुण्यात(पिंपरी चिंचवड) होणारा सनबर्न फेस्टिव्हल आजपासून चालु झाला.
आपल्या माहिती साठी सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?
सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल. हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या १० फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो. वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या ढंगात, ‘बेफिक्रे’ तरुणाई बेभान होऊन यात सहभागी होतात.  बिनधास्त डान्स, रापचिक म्युझिक आणि धुंदी आणणाऱ्या लाईट्समुळे हा फेस्टिव्हल परिचीत आहे. या फेस्टिव्हलमध्ये केवळ म्युझिक आणि डान्स नाही तर विविध कला, खान-पान, थरारक गेम्स, कलाकुसर, हस्तकलांचा मेळा इथे भरतो.  त्यामुळे इथे यायचं आणि इथलंच होऊन जायचं, असं आयोजन करण्यात येतं. सनबर्न फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष नाही. गेल्या ९ वर्षापासून म्हणजेच २००७ पासून गोव्यात हा फेस्टिव्हल सुरु आहे. दरवर्षी इयर एण्डिंगला या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. गोव्यातील हा फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच गोव्याबाहेर हलवण्यात आला आहे. यंदा तो पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
*सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास*
‘गॉडफादर ऑफ डान्स म्युझिक’ आणि MTV वरील ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्स व्हिला’चा अँकर निखील चिनापाने २००७ साली गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.
२००७ साली पहिल्याच वर्षी ‘सनबर्न’ने गोव्याचंच नव्हे तर जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. २००८ सालचा सनबर्न फेस्टिव्हल वर्षभरापूर्वीपासूनच चर्चेत होता. २००८ च्या फेस्टिव्हलची ‘इलेक्ट्रिक सर्कस’ ही थिम होती. त्यासाठी दोन मोठे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. ‘बन्यान ट्री’ हे ट्रान्स अॅक्टसाठी, तर ‘सर्कस स्टेज’ हे हाऊस म्युझिकसाठी होतं. याशिवाय या फेस्टिव्हलमध्ये वस्तू,पदार्थांचे विविध स्टॉल्स आणि बीच व्हॉलिबॉलचाही समावेश करण्यात आला होता. २००९ सालच्या फेस्टिव्हलला बावीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी सनबर्नच्या रात्रीचे साडेदहा ते पहाटे पाच या टाईमिंगने ‘वेळ’ भेदून तो चोवीस तासांचा केला. २०१० मध्ये सनबर्न फेस्टिव्हल मध्ये पहिल्याच सिझनला परदेशी कलाकरांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आधीच  गोव्यात परदेशी पाहुण्यांचा ओढा असताना, परदेशी कलावंतही या फेस्टिव्हलला हजेरी लावण्यासाठी मागे राहिले नाहीत. इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही २०१० सालच्या सनबर्न फेस्टिव्हलला हजेरी लावली होती.
२०११ सनबर्न फेस्टिव्हल गोव्यातील कांदोलिम बीच वर व  २०१२ साली सनबर्न फेस्टिव्हल गाजला. यापूर्वी कांदोलिम बीच सहा सीझन गाजवणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलने सातव्या सीझनसाठी जागा बदलली. गोव्यातीलच वागातोर इथं सातव्या सनबर्न फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळाली. यावेळी १२० आर्टिस्ट आणि २०० तासांपेक्षा जास्त म्युझिक ही या सिझनची खासियत होती. १० मोठे स्टेज आणि एक लाखांहून अधिक प्रेक्षक यावेळी सहभागी झाले होते. देशभरात गाजत असलेल्या तरुणाईच्या सनबर्न फेस्टिव्हलने गोव्याची मर्यादा कधीच ओलांडली होती. कॉलेज तरुणांमध्ये सनबर्न फेस्टिव्हलची चर्चा रंगत होती. त्याचवेळी विविध IIT, NIT, IIM आणि अन्य कॉलेजमध्ये सनबर्न फेस्टिव्हल पाहायला मिळाले. सनबर्न फेस्टिव्हलचा आठवा सिझन वागातोर इथंच पार पडला. एरव्ही तीन दिवस चालणारा हा फेस्टिव्हल २०१४ मध्ये ४ दिवस झाला. २०१५ चा सनबर्न फेस्टिव्हल चार दिवस रंगला आणी 2016 ही चार दिवस होता. दिवसेंदिवस हा वादग्रस्त होणार कार्यक्रम आहे. यावेळी गोव्याच्या आंतरराष्ट्रीय तिकीट पार्टनर ‘वियागोगो’ने  सनबर्न फेस्टिव्हलला आशियातील सर्वात मोठा म्युझिक फेस्टिव्हल जाहीर केलं. जगभरातील ४२ पेक्षा जास्त देशातील लोकांनी ‘वियागोगो’वरुन सनबर्न फेस्टिव्हलची तिकीटं बुक केली होती.

हा उत्सव संगीत, मनोरंजन, खाद्य आणि खरेदीचे मिश्रण आहे आणि 2009 मध्ये जगातील सर्वोच्च 10 उत्सवांपैकी एक म्हणून सीएनएन द्वारा क्रमांकित करण्यात आला. सीरियल उद्योजक शैलेंद्र सिंग, आणि पर्सेप्टचे जेटीचे एमडी यांनी हा महोत्सव स्वीकारला. आयएमएस एपीएसी बिझिनेस रिपोर्ट 2014 च्या अनुसार, टॉमोरलँड आणि अल्ट्रानंतर, या कप्तानपदाच्या अंतर्गत हा सण जगभरात तिसरा सर्वात मोठा नृत्य महोत्सव ठरला.  3 दिवसांहून अधिक काळ पसरलेल्या कलाकारांसोबत कलाकार एकाच वेळी खेळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका