शिवराज्य चलविण्याची पध्दत.

६ जून १६७४ ला शिवरायांचा प्रथम राज्याभिषेक होऊन शिवशक सुरु झाला.त्यावेळी महाराजांनी अष्ट प्रधान मंडल नियुक्त केले.फारशी भाषेतील नावांऐवजी संस्कृत भाषेतील नावे पदांना ( हल्लीच्या भाषेत खाते-ministry.) दिली.शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ असे होते.
१-मुख्य प्रधान( पेशवा)युद्ध करणे,ताब्यातील प्रदेशाची सुरक्षा पाहणे,सरकारी फर्माने काढणे,इ. कामे सोपवली होती.मोरो त्रीमल पिंगळे हे प्रथम मुख्य प्रधान होते.त्यांना वर्षाला १५००० होण पगार होता.
२-अमात्य( मुजुमदार) जमाखर्च,दफ्तर लिहिणे .नारो नीलकंठ व रामचंद्र नीलकंठ हे दोघे अमात्याचे काम बघत.पगार १२००० होण वार्षिक.
३-सचिव( सुरनीस) राजपत्राचे वाचन,दुरुस्त्या,राजाज्ञा वर ( सरकारी आदेशावर) ‘संमत’ चिन्ह लिहिणे.अण्णाजी दत्तो.
४-मंत्री( वाकनीस) सर्व खलबते,वाटाघाटी,तडजोडी सावधानतेने करणे.राजाची रोजची दिनचर्या -डायरी-लिहून ठेवणे.शिवरायांच्या इतरांबरोबर बैठकी आयोजित करणे,भोजन,मेजवान्या ची व्यवस्था पाहणे, ,वेळ पडल्यास युद्धावर जाणे,महाराजांच्या आज्ञापत्रावर संमत-approved शिक्का मारणे इ.दत्ताजी त्रिंबक.
वरील चार मंत्र्यांची जागा शिवरायांच्या उजव्या बाजूस होती.
५-सेनापती-( सरनोबत)युद्ध,जिंकलेल्या प्रदेशाचा,लुटीचे संरक्षण,सरकारी खजिन्यात जमा करणे.हंबीरराव मोहित हिंदवी स्वराज्याचे  पहिले सरनोबत होते.
६-सुमंत( डबीर) सध्याचे आपले परराष्ट्रमंत्री.–रामचंद्र त्रिंबक सुमंत.
७-न्यायाधीश-निराजी राउजी.
८-पंडितराव( दानाध्यक्ष).धार्मिक बाबी,प्रायश्चित,पूजापाठ,दानधर्म,अनुष्ठाने करणे.रघुनाथ पंडितराव.
मंत्री क्रमांक ५ ते ८ महाराजांच्या डावीकडे आसनस्थ होत.त्यांना वार्षिक १०००० होण पगार होता.
अष्टप्रधानांकडे स्वराज्यातील काही प्रांतांची पण जबाबदारी सोपविलेली असे.ते ज्यावेळी राजधानीबाहेर त्यासाठी जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांची कामे पाहत.मुतालीकांची नेमणूक पण विशेष जाचंपडताळ,चौकशी करूनच होत.प्रत्येक प्रधानास सहाय्यक असत ज्यांना दरकदार म्हटले जाई.ते खालीलप्रमाणे.
१-दिवाण,२-मुजुमदार-हिशेब तपासनीस.३.फडणीस -महसुलाचा हिशेब.४-सबनीस-दफ्तर-सरकारी दस्त,दफ्तर सांभाळणे.५-कारखानीस-पुरवठा अधिकारी.६-चिटणीस,७-जामदार( खजिनदार) व ८-पोतनीस-नाणे तज्ञ.
अष्टप्रधानांकडे १८ कारखाने जसे कि,खजिना,जवाहीर्खाना,तोफखाना,जामदारखाना,नगारखाना,शिकारखाना,वगैरे.
चिटणीस हुद्धा अष्टप्रधानमंडळात नव्हता.चिटणीस महाराजांचा मुख्य लेखक असून राज्यातील सर्व राजपत्रे ,पत्रव्यवहार,सनदा,दान्पत्रे तो लिहित असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका