नांदेड कोरोना नव्या रुगणांसह आकडा 26 वर

नांदेडकरानो काळजी घ्या
आज सकाळी प्रशासन कडून प्राप्त माहिती नुसार शहरात कोरोनाचे नव्याने २० रुग्ण आढळून आले आहेत. यासह रुग्णसंख्या २६ वर गेली आहे. 
 नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब येथील 97 जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  शहरात २२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अबचल नगर येथील ४४ वर्षीय रुग्ण सापडला होता. तर परभणी जिल्हयातील सेलू येथून उपचारास आलेली महिला कोरोनाबाधित आढळली होती. यातील पीरबुर्‍हाणनगर येथे राहणार्‍या व सेलू येथून उपचारासाठी आलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला.
नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील सतरा जणांपैकी तीन ट्रॅव्हल्स चालकांचे अहवाल पॉजिटीव्ह आले होते. शनिवारी गुरुद्वारा लंगर साहिब येथील 97 जणांचे अहवाल घेण्यात आले होते त्यापैकी 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
नांदेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २६ रूग्ण आढळले आहेत. यातील  दोघांचा मृत्यू झाला असून,२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका