प. बंगालची जनता टिएमसी मतदान करुन ममता बॅनर्जी यांना जिंकून देईल आणी ममता दिदी भाजपाला पुरून उरतील
बंगाल आणि आसामच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी या लक्षणीय लढतीसाठी आज मतदान होतेय. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. आज पश्चिम बंगालच्या 4 जिल्ह्यांतील 30 जागांवर निवडणुका होणार आहेत, तर आसाममधील 13 जिल्ह्यांमधील 29 जागांवर निवडणुका होत आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झाला. ममता बॅनर्जी स्वत: कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झाले. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची भवितव्य ठरणार आहे.