मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब टाकून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआय चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले.
उच्च न्यायालायाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी पदावर राहणे योग्य नाही.
अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरे जावे,15 दिवसांमध्ये चौकशी करा
मुंबई हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणं योग्य नसल्याच मत अनिल देशमुख यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडलं. अनिल देशमुख यांच्या या निर्णाला शरद पवार यांनीही ग्रीन सिग्नल दिला. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा नक्कीच स्वीकारतील, असं नवाब मलिक म्हणाले.