शिवभोजन थाळी आपल्या शहरात कुठे मिळेल ? पहा शासनाच्या खालील संकेतस्थळवर.

कोरोनाचा वाढत असलेले संक्रमण रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. शासनाने ब्रेक द चैन नावाने कोरोना साखळी तोडण्यासाठी मोहीम चालवली असून त्याच पार्श्वभूमीवर दि.14 एप्रिल रात्री पासून पुढील पंधरा दिवस लॉकडाऊन सदृश संचारबंदी सह कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच या धर्तीवर विविध वर्गाना पॅकेज स्वरूपात विविध प्रकारच्या मदतीची घोषणा केलेल्या आहेत.       या संकटकाळात निराधार, घराबाहेर असलेले व्यक्ती, कामानिमित्त बाहेर असलेले व्यक्ती यांना शिवभोजन थाळी ऐरवी 5 रुपायाला होती ती आता पुढील एक महिना मोफत देण्याचा कौतुकास्पद उपक्रम शासनाने घोषित केलेला आहे. 

      सदरील शिवभोजन थाळी नेमकी कुठे मिळेल याची प्रत्येक जिल्ह्यानिहाय यादी व त्याची संख्या चालू किंवा बंद हे सर्व माहिती जनतेला मिळावी या हेतूने सदरील माहिती खालील संकेतस्थळ (website) वर उपलब्ध आहे. 

http://mahaepos.gov.in/ShivBhojanTrans.jsp

 वरील लिंक ला टच केल्यास website Open होते व जिल्हाची यादी दिसते. त्या जिल्ह्याच्या नावाला टच केल्यास जिल्हाच्या यादीच्या त्या जिल्ह्यातील शिवभोजन थाळी ठिकाण (पत्ता) चालक व इतर माहिती दिसते.

गरजू व्यक्तीने याचा लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका