महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन साठा गुजरातला पळवण्याचा डाव उघड.

 महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन साठा गुजरातला पळवण्याचा डाव उघड 

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ऑक्सिजन साठ्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांना लागणारा प्राणवायू हा देशाच्या अन्य भागातून मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजनचा साठा गुजरातला पळवण्याचा कट समोर आला आहे. याआधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन साठा रोखल्याची घटना ताजी असतानाच ऑक्सिजन पळवण्याचा हा डाव समोर येणे धक्कादायक आहे. 

छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमधून नागपूर इथे ऑक्सिजन साठा घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र हे टँकर गुजरातमधील अहमदाबाद इथे वळविण्यात आले. एका व्यावसायिकाने सतर्कता दाखवून हे कारस्थान हाणून पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका