स्वराज्य पोरके झाले. शिवछत्रपतींना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

 आजच्या दिवशी 3 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी स्वर्गवासी झाले. आणी स्वराज्यातील अवघा मुलूख पोरका झाला. मूठभर मावळ्यांना उभा करुन स्वराज्य नावच वटवृक्ष तयार करणारे राजे आपल्यातून निघून गेलेत ही खबर स्वराज्यतील प्रत्येक प्रजाजणास धायमोकलुन रडायला लावणारी होती आभाळ कोळाल्यागत रयत उघडी पडली होती.

त्यांच्या तोंडी आपसूकच खालील ओळी येत होत्या.

पालखीचे भोई होता नाही आलं 

पण तुमच्या विचाराच्या रथाचे सारथी नक्की होऊ,

जीवात जीव असे पर्यंत तुमच्या समाधीची धूळ कपाळी लावू

आणि जेव्हा जगात नसू तेव्हा तुमच्या समाधीची धूळ बनून राहू….

*छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन.!* 

#ईमान_रायगडाच्या_मातीशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका