शिक्षकांचा पगार…
हल्ली शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, तसाच ईर्षेचा विषय झाला आहे.
शासनाच्या वर्गवारीनुसार तो (क-वर्गात) आहे. (अ आणि ब वर्गांची) चर्चा होत नाही, मात्र (क-वर्ग) सर्वांना खुपतो.
त्याची कारणेही तशीच आहेत…
१. लाखों सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे.
२. शिक्षकांचा सरळ संपर्क लोकांशी न येता त्यांच्या लहान मुलांशी येतो.
३. शिक्षकांवाचून कुणाचं आडत नसल्याने त्याचे महत्त्व कमी झाले.
उलट ग्रामसेवक, तलाठी, पोलिस, इत्यादी, यांचा आदर होतो.
बस चालक व इतर हे सर्व लोकांसाठी साहेब असतात.
शिक्षक मात्र मास्तर वगैरे…
न्यायालयीन भाषेत शिक्षक हा नोकर नाही.
तरीही समाज त्याची अवहेलना करतो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
शिक्षकाच्या पेशात भ्रष्टाचारास वाव नाही.
वेळेचे बंधन त्यास कटाक्षाने पाळावे लागते.
वर्गातील शेकडों कुटुंबातून आलेल्या विविविध जडणघडणीतल्या मुलांना समजून घेऊन योग्य वळण द्यावे लागते.
बाहेर हा जो सुव्यवस्थीत जो समाज दिसतो, तो शिक्षणाचाच परिणाम आहे.
एकीकडे शिक्षणाचे महत्त्व मान्य करायचे आणि त्या शिक्षणाचा कणा असलेला शिक्षक याचा उपमर्द करायचा ही कोणती मानसिकता…!
उठसूट कुणीही शिक्षकांबद्दल बोलत आहे.
करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते तुम्हाला चालतात.
त्यांच्यापुढे शेपूट घालता.
भ्रष्टाचार करून करोडोंची संपत्ती कमावणारे अधिकारी तुमच्यासाठी साहेब असतात,
आणि
तुमच्या चिमुकल्यांना आईच्या मायेने आणि बापाच्या धाकाने वळण लावणारे शिक्षक मात्र मास्तरडे…!
मुळात शिक्षक हा डी.एड, ए.टी.डी, ए.एम, बी.ए.बी.एड, बी.ए.स्सी.बी.एड, बी.ए.बी.पी.एड, एम.ए.बी.एड,वगैरे असतो…
आयुष्यातील पंचवीस वर्षे शिक्षण घेण्यात घालवलेले असतात. पुन्हा पाच-दहा वर्षे बिनपगारी, तरीही समाजाला शिक्षकाचा पगार दिसतो.
दिवसभर एक मिनिट देखील उशीर न करता आपल्या वर्गावर जाऊन नजरेला नजर भिडवून शिकवणारा, घसा कोरडा होई पर्यंत बोलत राहणारा, सतत उभा राहून शिकवणारा शिक्षक काय इतका हीन आहे की कुणी सोम्या-गोम्यानी त्याची अवहेलना करावी…
कित्येक प्रकारची सरकारी
कामे शिक्षक प्रामाणिकपणे करत आलेला आहे…
मुलांना सुट्टी म्हणून शिक्षकांना सुट्टी, ह्यात नवल ते काय, पण त्यावरही समाज त्याची ईर्ष्या करतो.
इतर सगळ्या नोकऱ्या शिक्षणामुळे आहेत.
शिक्षक हा शिक्षणाचा कणा आहे. याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे.
शिक्षक आदर मागत नाही,
पण तो त्यास पात्र आहे हेही खरे…!
विचार करा…!
पेस्टेड पोस्टःमाझ्या सर्व प्रिय आणि सन्माननीय गुरुजन बंधू-भगिनींना समर्पित.