शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणूक लढणार

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेची निवडणूक लढणार आहे. अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत छिंदमने प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केला. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर भाजपमधून आणि पदावरुन छिंदमची हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवजयंतीच्या तोंडावर महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला गेला. यानंतर छिंदमवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तो जामिनावर बाहेर आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका