विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्राम विकासाला आकार द्या…!
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन.
माहूर : शासनाच्या योजना या प्रामुख्याने ग्रामीण भागापर्यंत डोळसपणे पोहोचवा ज्यामुळे विकास बोलू लागेल व नागरिकांच्या पायाभूत समस्या दूर होतील.माहूर तालुक्यात विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्राम विकासाला आकार द्या. असे प्रतिपादन नांदेड जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले. त्या माहूर तालुक्यातील साकुर येथील उच्च पातळी बंधाऱ्यावरील आयोजित नांदेड जि.प.च्या जिल्हास्तरीय कार्यशाळा बैठक प्रसंगी प्रशासकीय कार्यक्रम बैठकीला जात असताना कुपटी गावात मागिल काळातील विविध विकास कामांचा संक्षिप्त आढावा घेताना नागरिक व कर्मचाऱ्यांशी संवाद प्रसंगी बोलत होत्या.या प्रसंगी नागरिकांशी सुसंवाद साधताना माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी युवराज मेहत्रे यांना वरील आवाहन केले. यावेळी कुपटी येथील मोक्षधाम व पशुवैद्यकीय दवाखान्यातील वृक्षरोपण करण्यात आले. वर्षा ठाकूर यांनी पुढे संवाद साधताना म्हणाल्या मानवी जीवनाचे अंतिम सत्य असणारे मोक्षधाम हे रमणीय व्हावे व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन झाली पाहिजे त्याच बरोबर ह्यात असणाऱ्या वृक्षांची देखभाल दुरुस्ती करून त्याला बैठकीसाठी गोल ओठे व मोक्षधामला असणाऱ्या भिंतीवर चांगले स्लोगन लिहा व अन्य बजेटमधून बाकडे व पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे सूचनावजा आव्हान गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे सह ग्रामसेवक अमोल कांडलकर याना केले आहे.तर पशुवैद्यकीय दवाखान्यातील वृक्षरोपणासह कार्यालयीन अवलोकन करून पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.चिलकेवाड यांना दुग्ध पशु व शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य सुचवुन समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव कदम यांनी सुचवलेल्या नुसार कुपटी प्राथमिक आरोग्य उप. केंद्राच्या आरोग्य सेविका ज्योती डोंगरे,एस.आर.जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.सरोजताई आडे व आशा कार्यकर्ती सुनीता वाघमारे, व अंगणवाडी सेविका यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी आयोजित वृक्षारोपण सोहळ्यात.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर सह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,मनरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधवराव सलगर, माहूर पं. स.च्या सभापती अनिता कदम, सरपंच ज्योती पवन बुरकुले,गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे, माजी जि.प.सदस्य प्रकाश पाटील भुसारे, बंडु पाटील भुसारे,विश्वनाथ कदम, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम पाटील भुसारे, पोलीस पाटील सुभाषराव कुर्मे,श्रीराम भुसारे, अनंतवाडी केंद्र प्रमुख सुरेश मोकळे, मुख्याध्यापक पी.एन.जगताप, आशिष माहुरे,नारायण आगिरकर,उपसरपंच सिध्दार्थ कवडे, देवानंद चोभे,महेंन्द्र जाधव,पत्रकार देवानंद कांबळे,गजानन भारती, युवा नेते प्रफुल भुसारे, बाबाराव पाटील व तालुक्यातील अधिकारी ,ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : माहूर तालुक्यातील कुपटी येथील विविध विकास कामाची पाहणी नांदेड जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली.यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना वैदयकीय अधीकारी डॉ.सरोजताई आडे, कुपटी उपकेंद्राच्या आरोग्य सेविका ज्योती डोंगरे,एस.आर. जाधव, सुनीता वाघमारे आदी
–