केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यातून जावे लागते. तसेच त्यांची खासगी मुलाखतही घेतली जाते. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
युपीएससी परीक्षेचा निकाल (महाराष्ट्र)
सृष्टी देशमुख – 5 वी
तृप्ती धोडमिसे – 16 वी
वैभव गोंदणे – 25 वा
मनिषा आव्हाळे – 33 वी
हेमंत पाटील – 39 वा
युपीएससी परीक्षेचा निकाल (भारत)
कनिष्क कटारिया