मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत.

आरक्षण का दिले होते?
 किती काळासाठी दिलें होते ? 
त्यासाठी खलील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे.

1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे.

2) प्रत्येक दहा वर्षानंतर आरक्षित समाजाचा मागासलेपणा तपासून कालावधी वाढवावा अशी तरतुद असताना कसलाही आढावा न घेता आरक्षण चालू ठेवले म्हणून आरक्षण रद्द करावे.

3) पूर्वी अस्पृश्यता पाळली जात होती म्हणून आरक्षण होते आता अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे.म्हणून आरक्षण रद्द करावे.

4) पूर्वी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणून आरक्षण होते.आता कोणीही मंदिरात प्रवेश करू शकतो कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.

5) पूर्वी पंगती भेद पाळला जात होता आता तसा पंक्तीभेद कोणी करत नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.

6)आंतरजातीय विवाहाला विरोध म्हणून आरक्षण होते आता अश्या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होत आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.

7)आर्थिक मागासलेपण तर असा युक्तिवाद केला जातो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. म्हणून आरक्षण रद्द करावे.

8) पूर्वी मराठा समाज जमीनदार होता आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्या वाढ व विभक्त कुटूंब पद्धत त्यामुळे  जमिनीचे वाटप त्यामुळे सर्व समाज  अल्पभूधारक झाला आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.

9) प्रत्येक जात आमचीच जात सर्वश्रेष्ठ आहे हे उच्चरवाने सांगत आहे.जर सर्वच जाती उच्च आहेत  तर उच्च नीच हा भेद राहिला कोठे म्हणून आरक्षण रद्द करावे .

 10)वरील सर्व बाबीचा विचार केला असता सामाजिक मागासलेपण सर्वच जातीचे संपले आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.

11) आता प्रश्न आर्थिक मागासलेपण हे सर्वच जातीत कमी अधिक प्रमाणात आढळते.

        म्हणून आज जी जात, समाज, धर्म ,पंथ धरून आरक्षण आहे ते कायमस्वरूपी रद्द करून फक्त आणि फक्त आर्थिक मागासलेपण हा निकष तो सुद्धा सर्वच ठिकाणी नाही. जेथे गुणवत्ता महत्वाची आहे उदा.डॉक्टर इंजिनिअर असा ठिकाणी फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे. 

मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यापेक्षा ह्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी करावी त्यासाठी आंदोलन उभारावे.

माझी खात्री आहे सर्वच समाजातून ह्याचे उस्फुर्त स्वागत होईल.

जे जातीयवादी आहेत ते विरोध करतील.व त्यांचा खरा चेहरा उघड होईल….

जय हिंद

जय जिजाऊ

जय शिवराय

जय महाराष्ट्र

🚩🚩🚩🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका