पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण या भौगोलिक प्रदेशातील मराठा समाज वेगवेगळा आहे?
९६ कुळी मराठ्यांनी ९२ कुळी मराठ्यांशी लग्न करायची नाहीत… कुणबी मराठ्यांना कमी लेखायचं… मराठवाडा प्रदेशातील मराठ्यांनी म्हणायचं, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे मुजोर-राजकारणी आहेत – त्यांनी मराठवाडा आणि विधर्भावर अन्याय केला… विधर्भ प्रदेशातील मराठ्यांनी म्हणायचं, सगळ्या सामाजिक संस्था- सहकारी संस्था- राजकीय संस्था यांची केंद्र पश्चिम महाराष्ट्रातीलच मराठ्यांकडे का? कोकण प्रदेशातील मराठे म्हणणार, हे घाटावरचे मराठे गावटी आहेत.. त्यांना ‘घाटी’ म्हणून पायाखाली पाहणार…
काय नक्की कारणं आहेत या सगळ्या प्रश्नांची आणि परिस्थितीची ?
आपण अजूनही कारणं आणि उत्तर शोधत बसलो तर… एकूण मराठा समाजाच्या दहा पिढ्यादेखील कमी पडतील!
चला सोडा आता हे सगळं.. पुढे चालुया…
मराठा तरुण पिढीने, मराठा समाजातील पोटी-जातींचा अक्षरक्षः निषेध करत मराठा समाज वास्तव्यास असलेल्या भौगोलिक प्रदेशांच्या ‘भौगोलिक मानसिकतेचा’ विचार जाळून टाकला तर आपण सर्व मराठे ९६ कुळी – ९२ कुळी – कुणबी असा पोट-जातीभेद न करता ‘एकसंघ जागतिक मराठा’ म्हणून एकत्र येऊ शकतो.
ज्या मराठ्यांनी कित्येक भौगोलिक प्रदेशांना जिंकलं.. अगदी तामिळनाडू पासून दिल्ली पर्यंत ज्या मराठ्यांनी भौगोलिक प्रदेशांची माळ रचत आपल्या सत्तेचं निशाण फडकावलं तेच मराठे आज… महाराष्ट्रात विदर्भ- मराठवाडा- कोकण- पश्चिम महाराष्ट्र असा भेद करत आहेत हे दुर्दैव मोठ्ठं आहे!
संपूर्ण जगात वास्तव्य असणाऱ्या तमाम मराठा समजाने विचारांनी आणि प्रगतीने एकत्र येण्याची निनांत गरज आहे, कारण हि वेळ आता शेवटची आहे हे लक्षात घ्या. मराठा समाजाची प्रगती आणि एकसंघपणा करण्याची जबाबदारी मोठ्या आशेने निभावत आहे. अशा मासिकांच्या माध्यमातून आपण सर्व मराठे आपल्या भल्याचा विचार करून चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करू शकत नाही का?)
९६ कुळी मराठा – पाटील – देशमुख – कुणबी मराठा ….. हे फरक उपयोगाचे आहेत का ?
९६ कुळी – पाटील – देशमुख मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अगदी भिकेला लागत आली तर त्यांचा ‘अहंकारा’ त्यांच्या खोट्या मोठेपणाला गप्प बसू देत नाहीय… आणि जेंव्हा यांना ‘आरक्षण’ मागण्याची वेळ आली की लेवा पाटील – कुणबी मराठा बांधव यांच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून यांच्या फेट्याला अजूनच आग लागते!
पाटील – देशमुखांची धोतर्र फाटत आली तरी… यांनी बाकी मराठ्यांना कमी लेखून दाबण्याचा प्रयत्न करायचा.. मग घरी खायला का नसेना… पण आम्ही पाटील – देशमुख .. मोठ्ठे! ..
साहजिकच ज्या मराठ्यांकडे ओ.बी.सी. प्रमाणपत्र आहे कि ज्यांना बाकी मराठे पोट-जातीभेद करून हीन वागणूक देतात ते ह्यांच्या आरक्षणाला विरोध करणारच!
स्वतःला उच्चकुळी समजणाऱ्या सर्व मराठ्यांनी आपली फाटकी आर्थिक गरिबी लपवण्यासाठी पोट-जातीभेदाचा किंवा भौगोलिक प्रदेश भेदाचा वापर करून स्वतःची ‘नागडी अवस्था’ झाकण्याचा प्रयत्न करू नये!
राज्यातील एका विशिष्ट भागातील मराठा समाज आर्थिक सुब्बतेनुसार सुधृद असू शकतो… अहो हि तर चांगलीच गोष्ट आहे कि… पण म्हणून बाकी प्रदेशातील मराठा बांधवांनी त्यांच्याविषयी जळजळ न करता उलट त्या सुधृढ भागातील मराठा बांधवांच्या मदतीने आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. दोषारोप- भेदाभेद करत राहून मराठा समाजाला अंतिमतः काहीही साध्य नाही. उलट नुकसानच आहे.
येणाऱ्या तरुण मराठा पिढीच्या डोक्यात मराठा पोट-जातीचे किंवा प्रदेश भेदाचे विषारी कृपया जाऊ देऊ नका. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. बाकी तुम्हाला फॉलो करतील…
बाकी तर.. आपण आहोतच ☺️
जय मराठा
तुम्ही बोलताय यात गैर नाही. उगीच पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या टिमक्या का मिर्वाव्यात. आणि येत्या काळात जातीचेच महत्त्व राहणार नाही मग पोटजातीस काय घेऊन बसलात?
आणि याच खोडीने तुम्हीही मागे रहा आणि लिंगायत लोकांनी जो घाट कर्नाटकात घातला तो जर याच ९२ कुळ्यांनी घातला तर?