मराठा आरक्षण- सुनावणी संपली, पण सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला!

मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात चालू असलेली  सुनावणी दिनांक १६ ते २६ मार्च 2021 अशी सलग दहा दिवस चालली. महाराष्ट्र सरकार, केंद्रसरकार, आरक्षण समर्थक याचिकाकर्ते, आरक्षण विरोधक याचिकाकर्ते यासर्वाच्या वकीलांनी युक्तिवाद करत आपले मत मांडले तसेच विविध राज्याने आपले मत मांडले.
          दहा दिवस चालेलेल्या या विषयात महत्त्वपुर्ण नोंदी म्हणून इंद्रा सहाणी केस, ५०% आरक्षण मर्यादा, केंद्र सरकार यांनी दिलेले आर्थिक मागासवर्गानां ई डबल्यु एस आरक्षण, १०२ वी घटनादुरुस्ती, राज्य मागसवर्गीय आयोग याबाबींवर युक्तिवाद झाले असून महाराष्ट्र सरकार यांनी स्थगिती उठविण्याबाबत युक्तिवाद झाला. तसेच इतर राज्यानीं इंद्रा सहाणी केस कालबाह्य झाली आता नव्याने आरक्षण मर्यादा बाबत पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे असा युक्तिवाद झालेला आहे.
    दि. २६ रोजी सुणावणी संपल्यानंतर कोर्टाने सदरील निकाल राखून ठेवला आहे. निकाल लवकर यावा यासाठी मराठा समाजात अतुरता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका