19 व्या शतकातील एक असामान्य स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे डॉ रखमाबाई राउत. यांचा जन्म 22 नोव्हेंबर1864 रोजी जयंतीबाई व जनार्दन सावे यांच्या पोटी झाला ,त्यांचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे अत्यंत बुद्धिमान ,कार्यकुशल व पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व .त्यांच्या कार्यकुशलतेमुळे ब्रिटिश शासनाकडून त्यांना “रायबहाद्दूर”ही पदवी व जस्टिस ऑफ पीस हा सन्मान मिळालेला.रखमाबाईच्या जन्मानंतर अल्पावधीतच जनार्धन सावेंचा आकस्मिक मृत्यू झाला ,पुरोगामी विचारांचा हरिश्चंद्र चौधरींनी जयंती बाईंचा विवाह सामाजिक व धार्मिक प्रवाहाच्या विरोधात ऐका विधुराशी म्हणजे डॉ सखाराम राउत यांच्याशी लावून दिला ,डॉ सखाराम राउत हे जे जे हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते .खऱ्या अर्थाने रखमाबाई च्या आयुष्याला इथे कलाटणी मिळाली ,त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या दुसऱ्या पित्याचा अत्यंत मौलिक वाटा आहे …”जन्म देणाऱ्या पेक्षा आयुष्य घडविणारा हा नक्किच थोर असतो”.
साधारणतः 1885 ते 1887 हा काळ रखमाबाईच्या आयुष्यातील अत्यंत क्लेशदायक व निर्णायक होता..या काळात त्यांनी स्वतःचा झालेला बालविवाह अमान्य करून कोर्टात यशस्वी लढा दिला त्यांच्या या अतुलनीय धाडसाचे स्त्री सुधारणावाद्यांनी खूप कौतुक केलं व एव्हढंच नव्हे तर बालविवाह संबधातील कायद्यात बदल व सुधारण्या करण्यासाठी तसा बदल सुचविणाऱ्या शिफारशी शासनाकडे पाठविण्यात आल्या .1885 या काळात रखमाबाई “हिंदू लेडी”या टोपण नावाने बालविवाह व सक्तीचे वैधव्य या विषयावर टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रातून लेख लिहीत ,हे दोन्ही विषय म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत नाजूक बाबी होत्या..पुरुषप्रधानता या दोन क्रूर प्रथांवर भक्कमपणे उभी होती ,साहजिकच पुरुषी वर्चस्वावर तो प्रहार होता व स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध चा तो एल्गार होता .
रखमाबाई ते डॉ रखमाबाई राउत…वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत परिस्थितीतून तापून सुलाखून निघाल्यावर आपल्या वडिलांचे म्हणजे डॉ सखाराम राउतांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1889 मध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासा साठी त्या इंग्लड ला रवाना झाल्या,इंग्लड मध्ये कॅम्ब्रिज ची परीक्षा आणि आर्ट्स चा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून इंग्लंड मध्ये 1890 मध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला व 1894 मध्ये शेवटची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या.
भारतात आल्यावर मुंबई च्या कामा हॉस्पिटल मधून त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेला सुरवात केली ,त्यानंतर सुरत येथील माळवी हॉस्पिटलमध्ये त्या रुजू झाल्या ,त्यावेळी सुरत येथे दुष्काळ व प्लेग च्या साथीच थैमान घातलेलं होत तिथे त्यांनी अत्यंत समर्पित भावनेने सेवा दिली …त्यांच्या सेवेबद्दल शासनाने त्यांना “कैसर ए हिंद “हा किताब देउन सन्मानित केलं . सुरत मध्येही स्त्रियांची स्थिती अत्यंत मागासलेली होती,घरी केलेल्या प्रसूतीमध्ये अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडत,रखमाबाईंनि त्या स्त्रियांच्या जागृतीसाठी व उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले ,प्रसूती साठी येणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी तिथेच बालवर्ग सुरू केले, हळुहळु त्यांच्या या कार्यात अनेक स्त्रिया जुळल्या ,स्त्री शिक्षनालाही अनौपचारिक सुरवात झाली पुढे त्यांनी त्या साठी वनिता आश्रमाची स्थापना केली .पुढे हे माळवी हॉस्पिटल “डॉ रखमाबाई हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाउ लागले .1917 ला सुरत हॉस्पिटल मधून निवृत्तीनंतर राजकोट येथील जनाना हॉस्पिटलमध्ये त्या रुजू झाल्या ,त्यांची सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या प्रमुख पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली .
पहिल्या महायुद्धातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रेडक्रॉस सोसायटीने त्यांचा पदक देउन सन्मान केला ,तसेंचअस्पृश्यां साठी त्यांनी स्वतः च्या आजोबांच्या मालकीच्या गावदेवीच्या मंदिरात अस्पृश्य महिलांना सोबत घेउन प्रवेश केला …
आयुष्यभर फक्त लोकांसाठी ,रुग्णसेवेसाठी दीर्घकाळ झटलेली डॉ रखमाबाई देशातील खऱ्या अर्थाने ” पहिली स्त्री डॉक्टर “ठरते .वयाच्या 91 वर्षापर्यंत फक्त आणि फक्त रुग्णसेवे साठी समर्पित राहिली .25 डिसेंबर 1955 साली ही महान नायिका प्रकृतित विलीन झाली .
२२ नोव्हेंबर2017 साली गुगल ने डॉ रखमाबाईच्या 153 व्या जयंती दिनी गुगल डुडल ने सन्मानित केले .
आज 22 नोव्हेंबर या महान नायिकेस 154 व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Note( पहिली महिला डॉक्टर म्हणून सन्मानित डॉआनंदीबाई जोशी जन्म- 31 मार्च 1865
मृत्यू -26 फेब्रुवारी1887
वैद्यकीय शिक्षण-वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिलव्हेनिया (completed her medical education on march 1886 )भारतात आल्यावर काही महिन्यातच क्षया ने मृत्यू झाला ,दुर्दैवाने त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा सोसायटीला होऊ शकला नाही ,डॉक्टर होऊनही कुण्याही देशभगिनीवर उपचार करण्याची संधी त्यांना मिळालीच नाही…)
डॉ रेखा पाटील चव्हाण
प्रदेशाध्यक्ष
जिजाऊ ब्रिगेड (महाराष्ट्र)
09850078433