जाधवांची लेक अन सुन भोसल्यांची विरमाता राजमाता माय शिवबांची

वर्हाडतील बुलढाणा जिल्ह्या सिंदखेडराजा गावी
१२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जन्म झाला.
महाराष्ट्रातील काही मातब्बर व शुर घराण्यापैकी जाधवराव घराणे होते. 
✍️ माँसाहेब जिजाऊ बद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी
स्थळ सिंदखेडराजा
पिता राजे लखुजीराव
माता म्हाळसाईराणी
बंधु राजे दत्ताजीराव,राजे अचलोजीराव,राजे बहादुरजी व राजे राघोजीराव.
जिजाऊ या सर्वात धाकट्या होत्या. राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह इ सन १६१०-११ साली देवगिरीच्या किल्ल्यावर पराक्रमी मराठा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांच्या सोबत झाला.
शिक्षक= जिजाऊंचे संपुर्ण राजकिय,प्रशासकीय,धार्मीक,न्यायीक व युद्धविषयक प्रशिक्षण पिता राजे लखुजीराव व बंधु यांच्या अधिकाराखाली झाले. जिजाऊ जन्माने या मातीस एक वेगळा आयाम प्राप्त झाला.याच जिजाऊंच्या अधिकाराखाली दोन छत्रपती ,महाराणी आणी एक सरसेनापती यांची कारकिर्द घडली आणी या मराठा स्वराज्यास एका उच्चपातळीवर नेऊन ठेवण्याचे कार्य याच माऊलीमुळे घडले……
जिजाऊ जन्मदिवसाच्या समस्त मावळ्याना हार्दिक शुभेच्छा !!!!
  जय जिजाऊ !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका