महाराष्ट्र: राज्यात कोरोना स्प्रेड खुप मोठ्या प्रमाणावर झाला देशातील दहा हॉटस्पॉट शहरापैकी बहुतांश शहर ही महाराष्ट्रातील आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या व वैद्यकीय सुविधा तुटवडा वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात काही खालील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
राज्य सरकारने काल राज्यात विकेंड लॉकडाउन आणि ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज आपल्या ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये वाढ केली आहे. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवांच्या यादीत आता पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी-माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते यांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. (the state government amended its break the chain order and also increased the list of essential services)
खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.
ह्या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत: