ऑनलाईन चॅटिंगमुळे जवळच्या नातेवाईकात येतोय दुरावा !

जयकुमार अडकीने – माहूर
  हल्ली अनेक जण आपले जवळचे नातेवाईक सोबत असतांना सुद्धा ऑनलाईन चॅटिंग मध्ये रममाण होतांना दिसत असल्याने सोबतच्या व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने नात्यात दुरावा होण्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्कात राहण्यासाठी हे प्रभावी माध्यम जरी असले तरी याच्या अतिरेकी वापराने सोबत असलेल्या व्यक्तीलाही पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याचे भान विसरल्या जात असल्याने दूरवरच्या व्यक्तीशी संवाद ठेवण्याच्या नादापायी क्षुल्लक बाबीवरून खटके उडून होत असलेला दुरावा चिंता जनक आहे. यामध्ये ग्रामीण, शहरी असा भेदाभेद मुळीच नसून ऑनलाईन चॅटिंग करणाऱ्याचा एक वेगळा वर्ग समाजात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ही मंडळी सैराट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी काल कलर्स मराठी टिव्हीवरील सुर नवा ध्यास नवा महाअंतिम सोळात बोलताना चिंता व्यक्त केली.
       ऑनलाईन चॅटिंगचे परिणाम भयंकर आहेत. घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दुःखांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं , एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं. लग्नाचा जोडीदार बाजूला बसलेला असताना एकस बॉय अथवा गर्ल फ्रेंडला मेसेज पाठवण किंवा चाट करन कठीण नाही. हि फसवणूक कशासाठी?चैटिंग करण , मेसेज पाठवण हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरकरणी हार्मलेस वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.
           मुळात आपल्या पार्टनरची फसवणूक करावी असं का वाटतं? ”त्यात काही जणांना थ्रिल वाटतं. असा प्रकार करत असताना सदरील  व्यक्ती  कॉम्पुटरच्या मागे सुरक्षित असते त्यामुळे तिच्यात एक फाजील आत्मविश्वास व धाडस आलेलं असतं. ‘इतर जे करतात ते मीही करू शकतो. मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. ज्यांच्यात व्हर्च्युअल करेज-धाडस निर्माण होतं ते असे प्रकार करतात; मात्र  हे खर धाडस नसून सायबर चॅटिंग हे व्हर्च्युअल वर्ल्डमध्येच होतं आणि यात जे भावनिकरीत्या गुंतलेले असतात त्यांना स्वत:च वागणं चुकीचं, अप्रामाणिक वाटत नाही. मी काही कोणाला प्रत्यक्षात बघत नाही किंवा सोअर्स करत नाही ती फसवणूक कशी होईल’ असा युक्तिवाद ते करतात. “ती फसवणूकच असते.
              जर दोन व्यक्तींचं नातं कसं असावं याचे काही नियम असतील तर ते सायबरवरही पाळायला हवेत. वास्तव आणि आभासी अशी आपल्या जीवनाची विभागणी झालेली नाही. तुमची निष्ठा हि सगळीकडे असायला हवी. माणसाचं व्यक्तिमत्व हे संमिश्र आहे. त्यामुळे फसवणूक चुकीचीच आहे,  आजकाल पती -पत्नी किंवा पार्टनर्स हे बरेचदा ऑनलाइन बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यातून त्याचा भावनिक संपर्क तुटतो. याचा परिणाम नात्यावर होतो. स्वत:च्या पार्टनरमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले का नाहीत हा खरा प्रश्न आहे. जर केअच नात्यात तुम्ही मनाने गुंतलात तर ऑनलाईन भटकंतीची गरजच भासणार नाही. ऑनलाईन चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत. घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दुःखांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं , एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं इतर अनेक बाबीवर कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात मात्र मानवी जीवनातील नाते संबंध जपण्याकरिता आवश्यक असलेल्या या विषयावर मात्र कुठेही मार्गदर्शन शिबिरे किंवा कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर सायबर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे.
                                                                                                            मोबा.९६२३४१०७३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका